तरुण भारत

कर्नाटकचे कृषिमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

बेंगळूर/ प्रतिनिधी

कर्नाटक राज्याचे कृषिमंत्री बी.सी. पाटील व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोना चाचणीनंतर त्यांचा व त्यांची पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर मंत्री पाटील यांना घरामध्ये अलग ठेवण्यात आले आहे. मंत्री पाटील यांनी त्यांच्यात व त्यांच्या पत्नीमध्ये कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे दिसून आली नसल्याचे म्हंटले आहे.

आपण लवकरच बरे होऊन व पुन्हा काम करण्यासाठी परत येईन असा आत्मविश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही. दुसर्‍या ट्वीटमध्ये पाटील यांनी आपला जावई देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे म्हंटले आहे.

पाटील यांच्या आधी वनमंत्री आनंदसिंग आणि पर्यटनमंत्री सी.टी. रवी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय मंड्या येथील अपक्ष खासदार सुमालता यांनी कोरोनाला पराभूत केलं आहे.

Advertisements

Related Stories

रेल्वेचे काहीअंशी खासगीकरण ग्राहकांच्या फायद्याचेच

Patil_p

तीन क्विंटल गांजा नष्ट

Amit Kulkarni

स्वतंत्र कचरा संकलनात अजूनही अडथळे

Patil_p

सामाजिक अंतर राखण्याची सूचना कुणासाठी ?

Patil_p

मनपा निवडणुकीबाबत न्यायालयामध्ये याचिका दाखल

Patil_p

ऍड.सुधीर चक्हाणांचा कंग्राळी ग्रामस्थांतर्फे सत्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!