तरुण भारत

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे निधन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राज्यसभा खासदार आणि माजी समाजवादी नेते अमर सिंह यांचे शनिवारी निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू होते. याच वर्षी त्यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन झाले होते. 


अमर सिंह हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले होते.1996 मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेल्यापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती. वर्तमानात ते उत्तर प्रदेशातील राज्यसभेचे सदस्य होते. 


गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ ते आजारीच होते. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे मित्र म्हणून त्यांना ओळखलेे जायचे. तसेच त्यांचे अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याशी जवळचे संबंध होते. मात्र नंंतर हे संबंध बिघडले. त्याबद्दल फेब्रुवारीमध्ये त्यांनी माफी देखील मागितली होती.

Related Stories

काँग्रेस व आप दिल्लीतील हिंसाचाराला जबाबदार : प्रकाश जावडेकर

prashant_c

सायरस मिस्त्रीना धक्का : एनसीएलएटीच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

prashant_c

भारताने दौलत बेग ओल्डी येथे तैनात केला T-90 टँकचा ताफा

datta jadhav

मंगळूर विमानतळावर बॉम्बमुळे खळबळ

sachin_m

अहमदाबाद विमानतळावर ‘अस्वल’ तैनात

Patil_p

पंजाबमध्ये 200 किलो अंमली पदार्थ जप्त

Patil_p