तरुण भारत

लंका प्रीमियर लीगमध्ये इरफान पठाण खेळणार

वृत्तसंस्था/मुंबई

श्रीलंकन भूमीत प्रथमच लंका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा घेतली जाणार असून या स्पर्धेत भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण सहभागी होणार आहे. स्पर्धेत 70 विदेशी क्रिकेटपटू सहभागी होणार असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले. सदर स्पर्धा 28 ऑगस्टपासून कोलंबोत खेळविली जाईल.

Advertisements

गेल्या जानेवारीत इरफान पठाणने क्रिकेटमधील आपली निवृत्ती जाहीर केली होती. लंका प्रीमियर लीग स्पर्धेत सहभागी होणाऱया पाच संघांच्या फ्रँचायजीमध्ये इरफान पठाणला खेळविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या स्पर्धेला लंकन शासनाकडून लवकरच अधिकृत परवानगी मिळेल, अशी आशा विविध संघांच्या फ्रँचायजींनी व्यक्त केली आहे. या स्पर्धेत कोलंबो, कँडी, गॅले, डंबुला आणि जाफना हे पाच संघ सहभागी होत आहेत.

विदेशातील टी-20 लीग स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटूंना सहभागी होण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाकडून परवानगी मिळणे जरुरी आहे. दरम्यान, पठाणने यापूर्वीच क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केल्याने त्याला लंकेतील या स्पर्धेत खेळण्यास बीसीसीआयकडून संमती मिळेल, असे समजते. लंकेचा माजी अष्टपैलू महारुफने या स्पर्धेसाठी पठाणला ऑफर दिली आहे. सदर स्पर्धेमध्ये एकूण 23 सामने खेळविले जातील. हे सामने चार आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत. गेल्या वर्षी अबुधाबीत झालेल्या टी-10 लीग क्रिकेट स्पर्धेत भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने मराठा अरेबियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

Related Stories

विश्रृत टायकर्स, गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स संघ विजयी

Omkar B

चेन्नईचे गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी पॉझिटिव्ह

Patil_p

वरिष्ठ महिला हॉकी संघाचा अर्जेन्टिनाकडून पराभव

Patil_p

अखेरच्या सामन्यातही भारतीय महिलांची बाजी

Patil_p

नव्या मोटेरा स्टेडियममध्ये 4 ड्रेसिंगरुम, 11 मुख्य खेळपट्टय़ा

Patil_p

रणजी चषकातून मुंबई आऊट

Patil_p
error: Content is protected !!