तरुण भारत

भाजपच्या गुजरात प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

ऑनलाईन टीम / गांधीनगर : 

भारतीय जनता पार्टीच्या गुजरात प्रदेशाध्यक्षपदी खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी जीतूभाई वाघाणी यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली.

Advertisements

चंद्रकांत पाटील हे सीआर पाटील म्हणून गुजरातमध्ये ओळखले जातात. ते मूळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पिंपरी आक्राउट येथील आहेत. 1960 मध्ये भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर पाटील यांचे कुटुंब गुजरातमध्ये स्थलांतरित झाले. सीआर पाटील हे गुजरातमधील नवसारी येथील खासदार आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय समजले जातात.

सी.आर.पाटील यांनी सुरत महानगराला कर्मभूमी म्हणून दत्तक घेतले होते. 25 डिसेंबर 1989 रोजी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर सुरत शहर भाजपच्या खजिनदारपदाची जबाबदारी 5 वर्षे आणि शहर भाजपचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी 2 वर्षे सांभाळली. गुजरातमधील आगामी पोटनिवडणुका, जिल्हा व तालुका पातळीवरील निवडणुकांसह विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असेल. 

Related Stories

कोरोनाची धास्ती : ‘या’ राज्यात 31 ऑगस्टपर्यंत वाढविला कर्फ्यू

Rohan_P

विहिरीचे बांधकाम कोसळून मालकासह तिघांचा मृत्यू

triratna

नेजल लसीच्या चाचण्यांना अनुमती

Patil_p

बडगाममध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश

datta jadhav

पंजाब विधानसभेत कृषी कायद्यांविरोधात विधेयके

Patil_p

राहुल गांधींकडून केंद्र सरकार लक्ष्य

Patil_p
error: Content is protected !!