तरुण भारत

कोल्हापूर : विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

वार्ताहर/पुलाची शिरोली

घराच्या डेरसवर खेळत असताना लोखंडी सळीचा विद्युत वाहिनीला स्पर्श होवून बसलेल्या विजेच्या धक्क्यात सातवीच्या विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. यादववाडी (पुलाची शिरोली) येथे ही दुर्देवी घटना घडली. यश पुंडलीक बिर्जे (वय-१३) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. आज, रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, यश हा आपल्या मिञा सोबत घराच्या डेरसवर खेळत होता. त्याच्या हातात लोखंडी सळी होती. त्या सळीचा स्पर्श विद्युत वाहिनीला झाला. त्यामुळे यशला शॉक बसला व जागीच गतप्राण झाला. तो कौतुक मराठी शाळेत शिकत होता. वडील मेकॅनिकलचे काम करतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. यश हा एकूलता एक मुलगा अकस्मित मयत झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : माहेरहून दहा लाख रुपये आणण्यासाठी पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न

Abhijeet Shinde

मोस्ट वाँटेड गँगस्टर काला जेठडी दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कर्तव्यदक्ष पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Abhijeet Shinde

दातृत्वाचे हात सरसावले… पाणी टंचाईतही `वडणगे पॅटर्न’

Abhijeet Shinde

कराड तालुक्यातील संघर्ष टाळण्यासाठी पवारांना विनंती

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवसात दुसऱ्यांदा नवे रूग्ण शेकड्यात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!