तरुण भारत

कॅमेरा पुरस्कारासाठी एक होतं पाणीची निवड

 दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड 2019 मध्ये श्एक होतं पाणीश् या मराठी चित्रपटाची निवड झाली असून या चित्रपटाने विविध क्षेत्रात एकूण  7 नामांकन पुरस्कार प्राप्त केले आहेत. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार सोहळा मराठी सिनेजगतात अतिशय सन्मानाचा समजला जातो.

या पुरस्कारासाठी व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज यांची निर्मिती असलेल्या एक होतं पाणी या चित्रपटाची निवड झाली आहे. डॉ.प्रविण भुजबळ व विजय तिवारी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहन सातघरे यांचे असून योगेश अंधारे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडली आहे. एक होता राजा,एक होती राणी… उद्या म्हणू नका, एक होतं पाणी अशी हटके टॅग लाईन असलेल्या या चित्रपटातून पाण्याची दाहकता मांडण्यात आलेली आहे. याचीच नोंद घेऊन दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड 2019  यासाठी ष्एक होतं पाणीष् या सिनेमाला एकूण 7 नामांकन पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट फिल्म ऑन सोशल इश्यू- एक होतं पाणी, बेस्ट निगेटिव्ह रोल -अनंत जोग, बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर- गणेश मयेकर, बेस्ट म्युझिक डिरेक्टर-  विकास जोशी, बेस्ट सिंगर (मेल)- हृषीकेश रानडे, बेस्ट सिंगर (फिमेल)ö आनंदी जोशी व बेस्ट लिरिसिस्ट – आशिष निनगुरकर असे एकूण 7 नामांकने पुरस्कार मिळाले आहेत.

Advertisements

या चित्रपटात अनंत जोग, हंसराज जगताप, श्रीया मस्तेकर, चैत्रा भुजबळ, गणेश मयेकर, यतीन कारेकर, रणजित जोग, दीपज्योती नाईक, त्रिशा पाटील, जयराज नायर, आशिष निनगुरकर, डॉ.राजू पाटोदकर, शीतल शिंगारे, शीतल कल्हापुरे आणि उपेंद्र दाते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि गीते आशिष निनगुरकर यांनी लिहिली असून संगीतकार म्हणून विकास जोशी यांनी काम केले आहे. ऋषिकेश रानडे, आनंदी जोशी, रोहित राऊत व विकास जोशी यांनी या गाण्यांना आवाज दिला आहे. प्रतिश सोनवणे, सुनील जाधव व स्वप्नील निंबाळकर यांनी निर्मिती व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे. आतापर्यंत या सिनेमाला विविध फेस्टिवलमध्ये गौरविण्यात आले आहे.

Related Stories

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ मध्ये तेजस बर्वेची एन्ट्री

Omkar B

चित्रपट निर्माते हंसल मेहता यांच्या वडिलांचे निधन

Rohan_P

विद्या बालनसोबत दिसणार इलियाना डिक्रूज

Patil_p

मुलीच्या न्यायासाठी गमावलं सर्वस्व

Patil_p

व्हायरस मराठीवर रंगणार व्हर्च्युअल दिवाळी पहाट

Patil_p

मुंबई : दिलीप कुमार यांची प्रकृती बरी नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना करा!

Rohan_P
error: Content is protected !!