तरुण भारत

सांगली : सासपडे खून प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला कोरोनाची बाधा

प्रतिनिधी / कडेगाव

सासपडे खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सात संशयित आरोपींचे काल शनिवारी (ता.1) सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी एका तीस वर्षीय संशयित आरोपीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर सहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

Advertisements

दरम्यान, सासपडे येथील संशयित कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रांताधिकारी गणेश मरकड,तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.माधव ठाकूर यांनी सासपडे येथे कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहे.तर कोरोना बाधीत रुग्णाच्या घरातील दहा लोकांना होम क्वारंनटाईन केले आहे.तर आरोग्य विभागाने गावात घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु केली आहे.
याचबरोबर कडेगाव पोलीस ठाणे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून या तीस वर्षीय आरोपीच्या संपर्कातील 10 व्यक्तीना आरोग्य विभागाने होम क्वारंनटाईन करण्यात आले आहे.तर कडेगाव पोलीस ठाण्यातील प्रमुख तीन अधिकारी यांची आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी केली जात आहे.तर संबंधित कोरोनाबाधीत संशयितास पुढील उपचारासाठी चिंचणी (ता.कडेगाव) येथे कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु केले आहेत.याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Related Stories

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक

Sumit Tambekar

साताऱयातील फादरवर बलात्काराचा गुन्हा

Patil_p

सातारा जिल्हा परिषदेमध्ये लसीकरण झालेल्याच नागरिकांना प्रवेश

Patil_p

‘साहस’ विजेत्या प्रियांकाचे साताऱयात जल्लोषी स्वागत

Patil_p

मार्च अखेर पालिका कर्मचाऱयांचे प्रश्न मार्गी लागतील

Patil_p

सांगली जिल्ह्यात धुवाधार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!