तरुण भारत

साडेतीनशे बाधितांवर घरातच उपचार

सिव्हिलवरील भार कमी करण्यासाठी उपाययोजना

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

सिव्हिल हॉस्पिटलवरील भार कमी करण्यासाठी प्रशासनाने बाधितांवर घरी किंवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तब्बल 350 बाधितांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या आरोग्यावर आरोग्य विभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

राज्य सरकारने लक्षणे नसणाऱयांवर घरीच उपचार घेण्यास परवानगी दिल्यानंतर ही उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. रविवारी रात्रीपर्यंतच्या आकडेवारीनुसार बेळगाव जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 4 हजाराच्या घरात पोहोचली आहे. यापैकी अकराशेहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सातशे खाटांचे सिव्हिल हॉस्पिटल आता पूर्णपणे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. लक्षणे असणारे व नसणारे अशा दोघांवरही याच इस्पितळात सुरुवातीला उपचार करण्यात येत होते. त्यामुळे साहजिकच ज्यांच्यावर खरोखरच इस्पितळात उपचारांची गरज आहे, अशा बाधितांना खाट मिळत नाही, अशी परिस्थिती होती.

नव्या नियमानुसार लक्षणे नसणाऱया बाधितांवर घरीच उपचार करण्यास मुभा मिळाली आहे. त्यामुळे बेळगाव शहरातील 350 हून अधिक बाधितांवर घरातच उपचार करण्यात येत आहेत. तर सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळात 2600 हून अधिक बाधितांवर उपचार सुरू आहेत.

सुरुवातीला संस्थात्मक क्वारंटाईन सक्तीचे होते. सरकारने नियम शिथिल करून कोणत्याही राज्यातून बेळगावसह कर्नाटकातील वेगवेगळय़ा जिल्हय़ात येणाऱयांना चौदा दिवस होम क्वारंटाईनची सक्ती केली. संस्थात्मक क्वारंटाईनच्या नियमात बदल करण्यात आले. आता लक्षणे नसणाऱया बाधितांवर घरीच उपचार सुरू आहेत.

अहवाल आल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाकडून त्यांची तपासणी केली जाते. जर लक्षणे दिसून आली नाहीत तर त्यांना सात दिवसांच्या औषधांचे किट दिले जाते व त्यांच्या घराजवळ बॅरिकेड्स उभे करून सीलडाऊन करण्यात येते. सात दिवसांनंतर पुन्हा एकदा स्वॅब तपासणी केली जाते, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वरि÷ अधिकाऱयांनी दिली.

Related Stories

राम मंदिरविषयी विविध हिंदू संघटनांची बैठक

Patil_p

रोजंदारी कर्मचाऱयांना अन्नधान्याचे किट

Amit Kulkarni

सुवर्ण सिंहासनासाठी शिंदोळी ग्रामस्थांतर्फे 1,01,101 रुपयांचा निधी सुपूर्द

Amit Kulkarni

स्वच्छ-सुंदर बेळगावसाठी नाल्यांची स्वच्छता मोहीम गरजेची

Amit Kulkarni

पावसाळय़ातील गमबूट गायब, प्लास्टिक-रबरी बुटांनाच पसंती

Patil_p

जुने बेळगाव येथे कलमेश्वर यात्रा साध्या पद्धतीने

Amit Kulkarni
error: Content is protected !!