तरुण भारत

धक्कादायक ! कोरोना रुग्णाचा मृतदेह कुत्र्यांनी फाडला

ऑनलाईन टीम / मिरज

मिरज – पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत एका कोरोना रुग्णाचा अर्धवट जळालेला मृतदेह कुत्र्याने शेतात ओढून नेऊन फाडून खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर घटनेनंतर सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी धाव घेऊन अर्धवट जळालेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. या घटनेमुळे मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची हेळसांड होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

स्मशानभूमीला संरक्षक भिंत नसल्याने हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महापालिका आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन मिरज कृष्णाघाट येथील डिझेल दाहिनी सुरू करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची उपाय योजना कराव्यात आशा सूचना संबधित विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सांगली जिह्यासह आसपासच्या जिह्यातील वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या चाचणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आले. त्यामुळे येथे हजारोंच्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत.आजवर अनेकांचा बळी गेला आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मिरज-पंढरपूर स्मशानभूमीत सोय केली आहे. आत्तापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या अनेकांचे मृतदेह येथे दहन करण्यात आले आहेत. महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी पीपीई किटसह अन्य सुरक्षित साधनांचा वापर करुन मृतदेहाची विल्हेवाट लावत आहेत.

दोन दिवसांपूर्वी याच स्मशानभूमीत एका कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह दहन करण्यात आला. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी योग्य प्रकारे खबरदारी घेऊनच मृतदेह दहन केला होता. मात्र, तो अधर्वट रित्या जळाला होता. रात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत कुत्र्यांनी अधर्वट जळालेला हा मृतदेह ओढून नेला. तसेच स्मशानभूमी शेजारीच असणाऱ्या एका शेतात तो टाकला. सोमवारी सकाळी सदरचा प्रकार निदर्शनास येताच प्रचंड संतापाची लाट उसळली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्धवट जळालेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. मृत्यूनंरही मृतदेहाची हेळसांड होत असल्याबद्दल अनेकांनी यंत्रणेवर ताशेरे ओढले. तर काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी थेट महापालिका आयुक्तांशी व संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

सदर स्मशानभुमीत दररोज मृतदेहांची विल्हेवाट लावली जात आहे. मात्र, रात्रीच्या वेळीस अधून – मधून पाऊस पडत असल्याने शिवाय वातावरणातही गारवा असल्याने कदाचिक चितेची आग विझून मृतदेह अर्धवटरित्या जळाला असेल. मात्र, यामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांची कोणतीही चुक नाही. ते योग्य खबरदारी घेऊनच काम करीत आहेत.जर मोकाट कुत्र्यांमुळे मृतदेहाची हेळसांळ होत असेल तर स्मशानभूमीला तात्काळ तारेचे कंपाऊंड लावले जाईल. कृष्णाघाट येथील डिझेल दाहिनी सुरू करुन तेथेही मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची सोय केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisements

Related Stories

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 10,309 नवे कोरोना रुग्ण; 334 मृत्यू

Rohan_P

महाराष्ट्रात 4 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

आता आधारप्रमाणेच मिळणार युनिक हेल्थ कार्ड

datta jadhav

घरी रहा, सुरक्षित रहा : सतेज पाटील

Abhijeet Shinde

प्रशांत किशोर बनले पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार

datta jadhav

अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून

datta jadhav
error: Content is protected !!