तरुण भारत

गुड न्यूज : लसीच्या चाचणीसाठी पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’ला डीसीजीआयची परवानगी

ऑनलाईन टीम / पुणे : 


जगभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संसर्गासोबतच कोरोना लसीचेही युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून भारतात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला कोरोना लस वैद्यकीय चाचणीसाठी परवानगी दिली आहे. 

Advertisements


सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीची कोरोना लस Astra Zeneca च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. 


मागील महिन्यातच ब्रिटेनच्या ऑक्‍सफर्ड यूनिव्हर्सिटीच्या कोविड-19 लशीचा पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वी राहिला आहे. यातील चाचण्यांचा निकाल अनुकुल आला आहे. ब्राझिलमध्ये केल्या गेल्लाय मानवी चाचणीचे परिणाम सर्वाधिक चांगले आले आहेत. आता भारतात देखील तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरु होणार आहेत. 


याबाबत बोलताना सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले की, आम्ही लस निश्चित बाजारात आणणार आहोत. लवकरच आम्हाला क्लिनिकल ट्रायल करण्यासाठी लायसन मिळेल. तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरुवात केली जाईल. 

Related Stories

महाराष्ट्रात मागील 24 तासात 11 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

‘अभ्यासघर’ संस्थेला यंदाचा बाल कार्य सन्मान जाहीर

Rohan_P

देशात मागील 24 तासात निच्चांकी रुग्णवाढ

datta jadhav

ओबीसी आरक्षणाचा निर्णय शुक्रवारी होण्याची शक्यता – नाना पटोले

Abhijeet Shinde

‘तुळशीबाग राममंदिरा’ कडून अयोध्येतील राममंदिरासाठी 11 लाख रुपयांचा निधी

Rohan_P
error: Content is protected !!