तरुण भारत

अयोध्या : राम मंदिर भूमिपूजन तयारीचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आढावा

ऑनलाईन टीम / अयोध्या : 


अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन ची तयारी जोरदार सुरू आहे. 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी अयोध्येत येणार आहेत. त्यापूर्वी आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भूमिपूजनेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत.

Advertisements


अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा क्षण जवळ येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वतीने लोकांना घरी बसून ऐतिहासिक क्षण पाहण्याचे आवाहन केले आहे.


मुख्यमंत्री योगी यांनी आज सर्व अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी भूमीपूजनस्थळाव्यतिरिक्त हनुमानघाडी मंदिरालाही भेट दिली. त्यांनी ‘अवधपुरी प्रभु आवत जानी, भई सकल सोभा कै खानी’ असे ट्विटही केले.

मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, बर्‍याच शतकांची प्रतिक्षा आता संपली आहे. व्रताचं फल मिळत आहे. संकल्प सिद्ध होत आहे. सर्व भाविकांनी घरी दीप प्रज्वलित करावे. श्री रामचरितमानस वाचावे. सर्व लोकांना भगवान श्री राम यांचे आशीर्वाद प्राप्त होतील.असे म्हटले आहे. 


दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी होणार्‍या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्याच्या सीमा बंद केल्या जाणार आहेत. अयोध्येत प्रवेश बंदी असणार आहे. या सर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज दाखल झाले आहेत. कोरोना विषाणूच्या संकटामुळे, मोठ्या संख्येने लोकांना येण्याची परवानगी नाही, भूमिपूजनाच्या वेळी दोनशेपेक्षा कमी पाहुणे उपस्थित राहतील.

Related Stories

कांगडाचा अनुज स्पेस एजन्सीमध्ये संशोधक

Patil_p

व्यापाऱयाची शोकांतिका, कर्जामुळे आत्महत्येचा प्रयत्न

Amit Kulkarni

अठरा वर्षांवरील सर्वांना लस विनामूल्य

Patil_p

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी १ लाख मोबाईल सरकारला परत करण्याचा घेतला निर्णय

Abhijeet Shinde

हिमाचल प्रदेश : क्वारंटाइन केंद्र आणि आंतरराज्यीय सीमांवर आता शिक्षकांची नियुक्ती 

Rohan_P

तालिबान्यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे दिले वचन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!