तरुण भारत

कोल्हापूर : वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी यांचे निधन

प्रतिनिधी / वारणानगर

येथील वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाच्या जडणघडणीत मोठे योगदान ठरलेले आणि वारणा परिसरातील अध्यात्मीक ऋषीतुल्य असे वारणा समुहाचे मार्गदर्शक वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचे उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब राजाराम गुळवणी (वय.८७) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले.त्यांच्या अकस्मिक निधनाने संपूर्ण वारणा परिसरावर शोककळा पसरली आहे.

वारणा परिसराचे ऋषीतुल्य, मार्गदर्शक स.आ.तथा मामासाहेब गुळवणी, वारणा समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या सोबत सहकारातील विकासाचे धडे गिरवले. त्यामुळे वारणेच्या एकूण प्रवासात डॉ. गुळवणी यांचा सिंहाचा वाटा होता. ऋषितुल्य मामासाहेब यांचा अध्यात्मिक विचारांचा वारसा देखील त्यांनी चालविला. मामासाहेब यांच्या मागे वारणेतील शुभकार्याचा प्रारंभ देखील त्यांच्या हस्ते केला जात होता. त्यामुळे वारणा समूहाचे ते आधारवड ठरले.

संघाला त्यांनी पदकार्य काळात व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथे त्यांचा ५ मार्च १९३३ ला झाला. तथापि ते नेबापूर (ता.पन्हाळा) वास्तव्यास होते. वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर असलेले मामासाहेब यांनी पन्हाळा, कळे येथे शिक्षण संस्थांची स्थापना केली. अभ्यासू व्यक्तीमत्व, स्मितहास्य, सर्वसमावेशक ददूरदृष्टी असलेले भाऊसाहेब लोकांचे जीवनदायी होते. वारणा दूध संघामध्ये १९९० पासून संचालक म्हणून कार्यास सुरुवात केली. २००५ ते २०१६ मध्ये अध्यक्ष, १९९६ ते २००५ ,व २०१५ पासून उपाध्यक्ष आज अखेर उपाध्यक्ष होते. पन्हाळा शिक्षण संस्थेसह वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळाचे अध्यक्ष तसेच महात्मा गांधी मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त, वारणा अँग्रोचे संचालक, तळसंदे येथील नवजीवन उद्योग संस्था समूहातील संस्थांचे संस्थापक होते. वारणा दूध संघाबरोबरच वारणा परिसरातील संस्थांतून श्रद्धांजली वाहण्यात आली.

वारणा कुटुंबांचा आधारवड हरपला – आम.विनय कोरे

वारणा उद्योग समुहाच्या जडणघडणीत डॉ. भाऊसाहेब उर्फ मामासाहेबांचे मोठे योगदान आहे. एक मार्गदर्शक अध्यात्मिक असे व्यक्तीमत्व सहकारमहर्षि तात्यासाहेब कोरे आणि कोरे कुटुंबियांच्या खांद्याला खांद्या देवून सहकार,सामाजिक कार्यात प्रत्येक कामात ते अग्रेसर राहीले आहे. मामासाहेबांच्या आकस्मिक निधनाने कोरे कुटुंबियांसह वारणा परीसराचा आधारवड हरपला.

Related Stories

कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’चा आज पहिला दिवस

triratna

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गुढीपाडव्‍याच्‍या मराठीतून शुभेच्‍छा

triratna

सातारा : कास तलाव ‘ओव्हर फ्लो’

triratna

ऊस तोडणी-ओढणीच्या कर्जांची चौकशी

triratna

सकल मराठा समाजाची उद्या, गुरुवारी कोल्हापुरात जिल्हास्तरीय बैठक

triratna

‘आयएनएस’च्या कार्यकारिणीपदी किरण ठाकूर यांची फेरनिवड

triratna
error: Content is protected !!