1145.87 कोटी रुपयांच्या क्लेमचा समावेश : संकटात आरोग्य विमा दिलासादायक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशामध्ये कोरोना संसर्गाची संख्या 18 लाखावर पोहोचली आहे. दिवसागणिक वाढत जाणारी रुग्णसंख्या आणि त्यामध्ये सरकारी दवाखाने सोडल्यास अन्य खासगी ठिकाणी मात्र कोविड 19 च्या रुग्णांसाठी शुल्क आकारले जात आहे. यामुळे सदर कालावधीत उपचार करुन घेण्यासाठी हेल्थ क्लेममध्ये मोठी वाढ होत गेल्याचे पहावयास मिळाले आहे.
आरोग्य विमा कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या तुलनेत हेल्थ क्लेमची संख्या 240 टक्क्मयांनी वधारली आहे. सर्व जनरल विमा कंपन्यांची सर्वोच्च संस्था जनरल इन्शुरन्स कौन्सलिंगच्या उपलब्ध आकडेवारीनुसार जुलै महिन्याच्या अंतिम सप्ताहापर्यंत 71423 नागरिकांनी कोराना उपचारासाठी 1145.87 कोटी रुपयांचे क्लेम केलेले आहे. या अगोदर 22 जूनपर्यंत फक्त 20965 नागरिकांनी कोरोना उपचारासाठी 323 कोटी रुपयांचे दावे दाखल केले होते.
हेल्थ क्लेममधील मोठय़ा तेजीनंतर देशामध्ये सध्याही विमा संरक्षणाचा विस्तार मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट होत आहे. देशात कोरोना विषाणूच्या संसर्गात एकूण नागरिकांमध्ये फक्त 4.08 टक्केच आरोग्य विमा संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी दावा दाखल करत आहेत.
आयुष्मान भारताशी जोडले दावे
देशामध्ये आरोग्य इन्शुरन्स उद्योगामध्ये विमा कवच जवळपास 2 लाख रुपये आहे. कोरोना प्रकरणांमध्ये संपूर्ण कुटुंब विळख्यात येण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे आरोग्य इन्शुरन्स कवरच्या अंतर्गत संपूर्ण खर्च करण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध नसल्याची माहिती असून 71423 क्लेममध्ये आयुष्मान भारतसंबंधी दाव्याचा समावेश आहे.