तरुण भारत

हॉनरचे लॅपटॉपसह 2 स्मार्टफोन्स सादर

बेंगळूर

 हॉनरने मॅजिकबुक 15 हा नवा लॅपटॉप भारतीय बाजारात विक्रीला उपलब्ध केला आहे. सोबत कंपनीने दोन स्मार्टफोन्सही सादर केले आहेत. भारतात आपला पहिला लॅपटॉप 8 जीबी रॅम, 256 जीबी एसएसडी, टु इन वन फिंगरप्रिंट पॉवर बटनसह कंपनीने दाखल केला असून तो 42 हजार 990 रुपये किंमतीला मिळणार आहे. सुरूवातीला लॅपटॉप खरेदीवर 3 हजारपर्यंतची सूट दिली जाणार आहे. कंपनीने ऑनर 9 ए आणि 9 एस हे स्मार्टफोन्स सादर केले आहेत. हॉनर 9 ए ची किंमत 9 हजार 999 रुपये असणार असून ऑनर 9 एसची किंमत 6 हजार 499 रुपये इतकी असणार आहे. 6.3 इंचाच्या हॉनर 9 ए मध्ये 512 जीबीपर्यंत एक्स्पांडेबल स्टोरेजची सोय असून पाठीमागे ट्रीपल कॅमेराही आहे.

Advertisements

Related Stories

आयफोन कंपनी ऍपलची परिषद जूनमध्ये

Amit Kulkarni

सोनी प्ले स्टेशन 5 चा कार्यक्रम लांबणीवर

Patil_p

सॅमसंगचा फोल्डेबल फोन झाला स्वस्त

Patil_p

सॅमसंगचा 110 इंची मायक्रो एलइडी टीव्ही

Patil_p

एलजी विंग स्मार्टफोन 28 ऑक्टोबरला भारतात

Patil_p

देशाची स्मार्टफोन निर्यात 1.5 अब्ज डॉलर्सवर ?

Patil_p
error: Content is protected !!