तरुण भारत

बेळगाव : ‘जीवनरेखा रुग्णालया’त कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात

बेळगांव / प्रतिनिधी : 


बेळगावच्या जीवन रेखा हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील मानवी चाचणीला प्रारंभ झाला आहे. हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी डॉ. अमित भाते यांनी चार जणांना ही लस टोचली आहे. यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. हे चारही स्वयंसेवक स्वेच्छेने लस घेण्यासाठी पुढे आले आहेत. 

Advertisements


शुक्रवारी लस टोचल्यानंतर त्यांना अद्याप कोणतीही रिॲक्शन आली नसून ते सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. केंद्र सरकारने या लसीची चाचणी करण्यासाठी ज्या 12 हॉस्पिटल्सची निवड केली आहे. त्यामध्ये कर्नाटकातील फक्त बेळगावच्या जीवन रेखा हॉस्पिटलचा समावेश आहे. भारत बायोटेक आयसीएमआर आणि पुण्याची इन्स्टिट्यूट ऑफ व्हायराॅलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने या लसीवर संशोधन होत आहे. 


जगभरातील तीनशेहून अधिक संस्था लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु त्यापैकी फक्त 15 चाचण्या मानवी चांचण्यापर्यंत पोहोचल्या आहेत. जीवन रेखा हॉस्पिटल हे एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून आयसीएमआर बरोबर “जीवनरेखा”चे औषध आणि लस यासंदर्भात आदान-प्रदान चालते. शुक्रवारी भारतात एकूण 375 जणांना ही लस देण्यात आली. 
जीवन रेखामध्ये ज्या चार जणांना ही लस देण्यात आली, त्यांची पुन्हा 15 दिवसांनी रक्तचांचणी करण्यात येईल. ही लस देण्यापूर्वी या चौघांचे स्वॅब आणि रक्ताचे नमुने दिल्लीच्या सेंट्रल लॅबला पाठवण्यात आले. ते पूर्णतः निगेटिव्ह असल्याने मानवी चांचणी करण्यास हरकत नाही, असा निर्वाळा सेंट्रल लॅबने दिला. त्यानंतर ही चाचणी करण्यात आली आहे. ही चाचणी करण्यापूर्वी त्यांची मान्यता घेण्यात आली असून डॉ. अमित भाते यांनी त्यांना या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देऊन त्यानंतर ही लस टोचली आहे.

Related Stories

विधानपरिषदेसाठी आज मतदान

Omkar B

हलगा गावातील गरजू नागरिकांसाठी सरसावले मदतीचे हात

Omkar B

ग्रा. पं. निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्धार

Omkar B

‘ऐतिहासिक निर्णय’: बी.एस.येडियुरप्पा यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

Sumit Tambekar

युवासेनेच्या उपक्रमाला शिवसेनेकडून मदत

Amit Kulkarni

नियंत्रण सुटून ट्रक शिरला थेट फार्महाऊसच्या आवारात

Amit Kulkarni
error: Content is protected !!