तरुण भारत

डॉ. फैसल सुलतान पाकचे नवे आरोग्यमंत्री

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने नवीन आरोग्य मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. डॉ. फैसल सुलतान हे आता पाकचे नवे आरोग्यमंत्री आहेत.

Advertisements

कोरोनाचा संकटाचा सामना करण्यास सरकार अपयशी ठरत असल्याने इम्रान खान सरकारवर चौफेर टीका होत होती. त्यामुळे मागील आठवड्यात आरोग्यमंत्री डॉ. झफर मिर्झा यांनी राजीनामा दिला होता. पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी मिर्झा यांच्या जागी डॉ. फैसल सुलतान यांची नियुक्ती केली आहे.  

ऑगस्ट 2018 मध्ये सत्तेवर आलेल्या इम्रान सरकारमध्ये सुरुवातीला आमीर कयानी हे आरोग्यमंत्री होते. देशातील औषधांच्या किमती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याने कयानी यांना पदावरून हटवण्यात आले. त्यांच्या जागी मिर्झा आरोग्यमंत्री झाले. मिर्झा यांच्या राजीनाम्यानंतर सुलतान आरोग्यमंत्री झाले.

Related Stories

महामार्गाच्या मधोमध कैद घर

Patil_p

कोरोनाची धास्ती : बिहारमध्ये 16 ऑगस्टपर्यंत वाढवले लॉक डाऊन

Rohan_P

सायबेरियात सापडली 28 हजार वर्षे जुनी सिंहिण

Patil_p

वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करु नका; उध्दव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

Rohan_P

मराठा आरक्षण : राज्य सरकारनेही फेरविचार याचिका दाखल करावी

Abhijeet Shinde

अमेरिकेत दिलासा शक्य

Patil_p
error: Content is protected !!