तरुण भारत

धोका वाढला : दिल्लीत कोरोना बाधितांचा आकडा 1, 38, 482 वर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


देशात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. देशाची राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासात  805 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 38 हजार 482 वर पोहचली आहे. यामधील 10 हजार 207 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Advertisements


दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी 937 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख  24 हजार 254 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4021 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   


ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 10 लाख 73 हजार 802 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 3904 आरटीपीसीआर टेस्ट आणि 6229 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

पंजाब विधानसभेत ‘सीएए’ रद्दचा ठराव

Patil_p

बाबरी विध्वंस खटल्याचा निकाल 30 सप्टेंबरला

datta jadhav

महाराष्ट्रात दिवसभरात 3 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

जन्माष्टमीचा उपवास धरला म्हणून विद्यार्थ्यांना मारहाण; शिक्षकाचं तात्काळ निलंबन

Abhijeet Shinde

Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिरोळ येथील पद्माराजे विद्यालय येथील पूरग्रस्तांशी साधला संवाद

Abhijeet Shinde

राज्य सरकारचा मोठा निर्णय;पूरग्रस्तांसाठी कायमस्वरुपी उपायांसाठी ११ हजार ५०० कोटींची मंजुरी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!