तरुण भारत

सांगली : कारागृहात उद्रेक, 62 कैदी पॉझिटिव्ह

जिल्हय़ात विक्रमी 354 रूग्ण ः कोरोनाने सहा बळी ः जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारीही बाधित ः मनपाक्षेत्रात 211 बाधित

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

जिल्हा कारागृहात कोरोनाचा उद्रेक झाला. याठिकाणी एकाचवेळी 62 कैदी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तातडीने ही इमारत सॅनिटायझर करण्यात आली. तसेच या कैद्यांना एका कक्षात अलगीकरण करण्यात आले असून त्यांच्यावर त्याचठिकाणी उपचार करण्यात येणार आहेत. सोमवारी जिल्हय़ात कोरोनाचे 354 रूग्ण वाढले तर 101 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सांगली महापालिका क्षेत्रात 211 नवीन रूग्ण वाढले आहेत. तर ग्रामीण भागात 143 रूग्ण वाढले आहेत. तर सहा जणांचा बळी गेला आहे.

सांगली-मिरजेत 211 रूग्ण वाढले

सांगली-मिरजेत कोरोनाचा कहर सुरूच आहे. रविवारी ही यामध्ये मोठय़ाप्रमाणात रूग्णांची भर पडली आहे. ही वाढती रूग्णसंख्या चिंताजनक बनत चालली आहे. एकटय़ा महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्येने दोन हजाराचा आकडा पार केला आहे. तरीही रूग्णसंख्य़ा आटोक्यात येण्याची चिन्ह दिसून येत नाही. सांगली शहरात अँटिजेन टेस्टमध्ये 31 नवीन रूग्ण वाढले आहेत. ज्या व्यक्तीचे वय 50 पेक्षा अधिक आहे त्या सर्व व्यक्तीची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे मोठय़ाप्रमाणात रूग्ण वाढत चालले आहेत. यामध्ये ज्या रूग्णांना सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नाहीत त्यांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. तर ज्यांना लक्षणे दिसून येत आहेत त्यांना मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. मिरज शहरात ऍण्टीजन टेस्टमध्ये 12 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सांगली शहरात 122 आणि मिरज शहरात 89 रूग्ण वाढले आहेत.

जिल्हा कारागृह हादरले

सांगली जिल्हा कारागृहात एकूण 319 कैदी आहेत. यातील 94 कैद्यांचे स्वॅब दोन दिवसापूर्वी घेण्यात आले होते. त्यामधील 62 कैदी हे पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांचा अहवाल सोमवारी सकाळी आल्यानंतर तातडीने जिल्हा कारागृहाच्या प्रशासनाने या पॉझिटिव्ह कैद्यांना एका बरॅकमध्ये ठेवले आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. दरम्यान जिल्हा प्रशासनाने या कैद्यांना बाहेर उपचार करण्यापेक्षा कारागृहातील एका बरॅकमध्ये उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या कैद्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे गरजेचे आहे त्यांना मात्र तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. पण ज्यांना सौम्य लक्षणे आणि कोणताही त्रास नाही त्यांच्यावर मात्र कारागृहातच उपचार केले जाणार आहेत. या 62 कैद्यामध्ये तीन महिला कैद्यांचा समावेश आहे तर 59 पुरूष कैदय़ांचा समावेश आहे. यातील एका कैद्यांचा अहवाल आला आहे पण तो जामीनावर सुटला आहे. त्यामुळे त्याचाही शोध सुरू आहे. अद्यापही 31 कैद्यांचा अहवाल येणे बाकी  आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहितीसाठी कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी सुशील कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या कैद्यांची तब्येत चांगली असल्याचे सांगितले तसेच डॉक्टरांच्याकडून तपासणीही सुरू असल्याचे स्पष्ट केले. चार महिन्यापासून कैद्यांना कोणताही संसर्ग होऊ नये याची दक्षता घेण्यात आली होती. पण गेल्या महिन्यापासून कैद्यांचे आत-बाहेर येण्याचे प्रमाण मोठय़ाप्रमाणात वाढल्याने त्यातून हा संसर्ग निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या प्रशासनाकडून तातडीने ही सर्व इमारत सॅनिटायझर करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागात 143 रूग्ण

आटपाडी तालुक्यात सात, जत तालुक्यात 17, कडेगाव तालुक्यात सात रूग्ण आढळून आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 23 तर मिरज तालुक्यात 48 रूग्ण आढळले आहेत. पलूस तालुक्यात 12, खानापूर तालुक्यात एक, शिराळा तालुक्यात दोन, तासगाव तालुक्यात पाच, वाळवा तालक्यात 21 असे ग्रामीण भागात 143 रूग्ण वाढले आहेत.

जिल्हा परिषदेमध्ये वरिष्ठ अधिकारी पॉझिटिव्ह

जिल्हा परिषदेमधील मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि चार कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये वरिष्ठ अधिकाऱयांना कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. हे वरिष्ठ अधिकारी सर्व बैठकांना हजर असतात त्यामुळे जिल्हा परिषदेचे प्रशासनही हादरून गेले आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेमधील 37 लोक बाधित आढळून आले आहेत.

सहा जणांचा मृत्यू

 सांगली शहरातील 56 वर्षीय महिलेचा मिरजेच्या कोरोना रूग्णालयात  उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच मिरज तालुक्यातील कवठेपिरान 75 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील 44 वर्षीय व्यक्तीचा  उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. सुरूल येथील 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मांगरूळ येथील 72 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  तर मिरज येथील 70 वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सोमवारी सहा जणांचे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या 102 झाली आहे.

 101 जण कोरोनामुक्त

 जिल्हय़ातील विविध भागात  उपचार सुरू असणारे 101  जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्च देण्यात आला आहे. त्यांना आता होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर उपचार सुरू असणाऱया 55 जणांच्यावर मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती

एकूण रूग्ण    3437

बरे झालेले     1457

उपचारात      1878

मयत           102

Related Stories

कोल्हापूर : तिळवणीत एका युवकास कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

पाटगाव परिसरात विक्रमी पावसाची नोंद

Abhijeet Shinde

समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल यांची आत्महत्या

Rohan_P

माजी विद्यार्थीनी लोहिया शाळेला दिली आपुलकीची भेट

Patil_p

महाराष्ट्र : वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर ; ऊर्जामंत्री नितीन राऊत

Rohan_P

म्हासुर्लीत दोन गटात तुंबळ मारामारी, पाच जखमी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!