तरुण भारत

कोल्हापूर : ‘लाभांश’ला 31 मार्च 2021 उजाडणार!

-सर्वसाधारण सभेच्या मंजुरीचा अडसर

-सभासदांची यंदाची दिवाळी बेतातच…

Advertisements

कोल्हापूर ःसहकाराचा लोगो वापरणे

कोल्हापूर / विठ्ठल बिरंजे

लॉकडाऊनमुळे सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांना 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिल्याने ऐन दिवाळीत हक्काने मिळणाऱया लाभांशासाठी दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. वार्षिक सभेच्या मंजुरीनंतरच लाभांश वाटप करण्याची सहकार कायद्यात तरतुद आहे. त्यामुळे नविन आर्थिक वर्षाच्या शेवटीच लाभांश सभासदांच्या हातात पडणार असल्याने यंदाची दिवाळीत हात आखडता घ्यावा लागणार आहे. दरम्यान सभा कधीही घ्या, पण लाभांश आगोदर देवून कार्योत्तर मंजुरी घ्यावी, अशी मागणी सभासदांतून पुढे आली आहे.

  नजिकच्या 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षातील संस्थेचा लेखाजोखा सभासदांसमोर ठेवून त्यास मंजुरी घेण्यासाठी सहकारी संस्थांसाठी वार्षिक सभा महत्वाच्या मानल्या जातात. 31 जुलैपर्यंत लेखापरीक्षण करुन ऑडीट मेमो जिल्हा लेखापरीक्षक यांना सादर केल्यानंतर वार्षिक सभा घेतली जाते. संस्था नफ्यात असल्यास नफ्यातील हिस्सा लाभांशच्या रुपाने सभासदांना दिला जातो. 15 टक्क्यापर्यंत हा लाभांश संस्था देवू शकतात. त्याहून अधिक द्यावयाचा झाल्यास जिल्हा उपनिबंधकांची मंजुरी आवश्यक आहे. यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत सभा घेण्याची कायद्यात तरतुद आहे. महराष्ट्रामध्ये ऑगस्ट, सप्टेंबरपासून सनासुदीचे दिवस सुरु होतात. सध्या श्रावण सुरु आहे. गणपती तोंडावर आला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरला दसरा, दिवाळी हे दोन मोठे सन असतात. या सनांमध्ये प्रत्येक कुटुंबाला मोठा खर्च असतो. नोकरदार वर्गाला बोनसचा आधार मिळतो. दूध संस्था, सेवासोसायटी, साखर कारखाना, बँक आदी संस्थांमध्ये शेतकरी वर्ग मोठय़ा संख्येने सभसद असतो. शेतकरी वर्गाला शेतीती उत्पान्न आणि सहकारी संस्थांकडून मिळणारा लाभांश या काळात मोठा आधार ठरत असतो. त्यामुळे लाभांश कधी मिळले याकडे त्याचे लक्ष लगलेले असते. मात्र यंदा कोरोनाच्या महामारीने शेतकरी, सभासदांच्या आशेवर पाणी फिरले आहे. सर्वसाधारण सभेनंतर लाभांश मिळणार आहे.

तपशील      पूर्वी   आत्ता

मेमो जमा करणे      30 जुलै      30 डिसेंबर

वार्षिक सभा घेणे     30 सप्टेंबर   31 मार्च     

सभेची मान्यता घेण्याच्या अटीवर परवानगी मिळावी

सर्वत्र सणासुदीचे दिवस असताना. ते साजरे करण्यासाठी लोकांच्याकडे पैसे नाहीत. अशी वाईट अवस्था झाली आहे. येणाऱया गणपती, दसरा, व दिवाळीसाठी तरी लोकांच्या कडे पैसे यावेत. सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्याच्या अटीवर लाभांश वाटप करण्याची परवानगी मिळाली पाहिजे

शिरीष देसाई, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेल

कायद्यातील तरतुद महत्वाची

सभासदांना त्यांच्या हक्क मिळाला पाहिजे हे जरी खरे असले तरी कायदाही तितकाच महत्वाचा आहे. एका जिल्हय़ापूर्ती ही परिस्थिती नाही. राज्य सरकारकडून आदेशानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.

अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक

Related Stories

राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

triratna

सांगली : पाच जणांचा मृत्यू, 168 रूग्ण वाढले

Shankar_P

राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या महिला पदाधिकाऱ्याने अरेरावी करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांना सुनावले

Shankar_P

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स

pradnya p

कोल्हापूर : कोरोना रुग्णावर घरीच उपचार, पहिला पथदर्शी प्रकल्प वडणगेत

triratna

सीपीआर’मधील नॉन कोरोना रूग्ण स्थलांतरीत

triratna
error: Content is protected !!