तरुण भारत

पणजीत सुमारे 1 लाखाचा गुटखा जप्त

महापौर उदय मडकईकर यांची माहीती

प्रतिनिधी / पणजी

शुक्रवारी संध्याकाळी पणजी महानगरपालिकेतर्फे पणजी मार्केट जवळील किस्मत हॉटेलजवळ दोन दुकानावर धाड टाकून सुमारे 1 लाख रुपयांचा गुटखा माल जप्त करण्यात आला होता. सोमवारी या मालची छाननी करण्यात आली असून यात 50 हजार रुपयांचा गुटखा तर 50 हजार रुपयांची सिगरेटची पाकिटे जप्त करण्यात आली आहे. अशी माहीती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

पणजी मार्केट जवळील महादेव जनरल स्टोअर्स आणि महालक्ष्मी जनरल स्टोअर्स या दोन दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात हा माल जप्त करण्यात आला आहे. मनपाच्या बाजार निरिक्षकांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

गुटखा विकणाऱयांना अनेकदा या संदर्भात इशारा देण्यात आला होता. परंतु आता शहरात गुटखा विक्री करणाऱयावर कडक कारवाई मनपातर्फे करण्यात येणार आहे. अशा प्रकारची कारवाई आता यापुढे सुरुच राहणार आहे. गरज पडल्यास मोठय़ा प्रमाणात दंड आकारुन दुकाने सिल करण्यात येईल. असे देखील मडकईकर यांनी अधिक माहीती देताना सांगितले.

Related Stories

कुडणे महालक्ष्मी कलश बैठक मंदिर अध्यक्षपदी राजेंद्र मायणीकर

Patil_p

स्वातंत्र्यसैनिकांच्या अनुपस्थितीत आज क्रांती दिन सोहळा

Omkar B

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार गोवा बागायतदार संस्था, व्यवसायिकांकडून काजू विकत घेण्यास सुरुवात

Omkar B

मेरशी पंच प्रकाश नाईकचा गोळी लागून मृत्यू

Patil_p

निसर्ग जपून, विकासाला चालना हेच सरकारचे धोरण !

Amit Kulkarni

सांगेचा प्रभाग 1 अनु. जमातींसाठी राखीव ठेवल्याने तीव्र नाराजी

Patil_p
error: Content is protected !!