तरुण भारत

कोल्हापूर : राम मंदीर पायाभरणी कार्यक्रम उत्साहात साजरा करा, भाजपाचे आवाहन

प्रतिनिधी/कोल्हापूर

गुरुवार 5 ऑगस्ट रोजी सर्व भारतीयांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री राम जन्मस्थानी अयोध्या येथे भव्य राम मंदिराची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. हा आपल्या सर्वांच्या जीवनातील ऐतिहासिक संस्मरणीय प्रसंग असून मागील अनेक शतकातील सर्व हिंदूंच्या मनातील भावनेची परिपूर्तता यानिमित्याने होत आहे. यामुळे या ऐतिहासिक सुवर्णक्षणाला अतिभव्यतेने व उत्साहात आपण सर्वजण साजरे करूयात.

भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित मंगळवार पेठ येथील श्री राम मंदीर येथे सकाळी 11 वाजता प्रभू श्री राम यांची पुजा, आरती करण्यात येणार आहे.

भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन हा दिवस उत्साहात साजरा करावा. दिनांक 5 ऑगस्ट रोजी सर्वानी घरी गुढी उभारावी, घरासमोर रांगोळी काढावी, सकाळी 11 वाजता घंटानाद करावा, घरामध्ये रामरक्षा स्तोत्र म्हणावे, रामभजण म्हणावे, सायंकाळी घराला रोषणाई करावी, घरासमोर आकाश दिवे लावावेत, घरासमोर पणत्या लावाव्यात हा दिवस दिवाळी सारखा मोठ्या आनंदाने उत्साहात साजरा करावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती पाहता निर्बंध मे महिन्यापर्यंत वाढवण्याची शक्यता- राजेश टोपे

Abhijeet Shinde

वेळे येथे अपघात नवविवाहितेचा मृत्यू

Patil_p

”मुख्यमंत्र्यांची फसगत करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःच महापालिकेच्या सत्ताधीशांची कानउघडणी केली पाहिजे”

Abhijeet Shinde

विधीमंडळाबाहेर भाजपने भरवली प्रति विधानसभा ; फडणवीसांनी मांडला आघाडी सरकारविरोधात धिक्कार प्रस्ताव

Abhijeet Shinde

कुर्डुवाडी : भोसरेत आणखी दोघे कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

धारण क्षेत्रात पावसाचा जोर कायम; खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग

Rohan_P
error: Content is protected !!