तरुण भारत

यूपीएससीचा निकाल जाहीर; प्रदीप सिंह देशात अव्वल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


केंद्रिय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2019 चे निकाल जाहीर केले आहेत. परीक्षेत प्रदीप सिंह देशात अव्वल आला आहे. तर दुसऱ्या स्थानी जतिन किशोर तर प्रतिभा वर्मा देशात तिसरी आणि महिला उमेदवारांमध्ये प्रथम आली आहे. यावर्षी विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.


निवड करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये 308 उमेदवार जनरल कॅटेगिरी, 78 उमेदवार ईडब्ल्यूएस कोटा, 251ओबीसी, 129 एस सी आणि 67 उमेदवार एसटी कॅटेगिरीतील आहेत.  तर 11 उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.


यूपीएससीने सप्टेंबर 2019 मध्ये घेतलेल्या लेखी आणि फेब्रुवारी ते ऑगस्ट 2020 मध्ये घेतलेल्या मुलाखती किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीच्या निकालाच्या आधारे निकाल जाहीर केला. उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम यादी वेबसाईटवर घोषित केली आहे. 


महाराष्ट्रातील नेहा भोसले देशात 15 वी, बीड मधील मंदार पत्की देशात 22 वा , योगेश अशोकराव पाटील देशात 63 वा आणि राहुल लक्ष्मण चव्हाण देशात 109 व्या स्थानी आला आहे. 


यूपीएससी दरवर्षी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस- IAS),भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस – IFS), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस- IPS)आणि इतर केंद्रीय सेवांसाठी परीक्षा घेते.


नागरी सेवा परीक्षा 2020 या 31 मे रोजी होणार होत्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या 4 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Related Stories

इंडिया, द ग्रेट !

tarunbharat

महाराष्ट्र : कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 24,581 वर

pradnya p

राजस्थानमध्ये 2,132 नवे कोरोना रुग्ण; 15 जणांचा मृत्यू

pradnya p

एसबीआयकडून कर्ज व्याजदरांवर ‘ऑफर’

Patil_p

उद्योगधंदे सुरू करण्यास सशर्त अनुमती

Patil_p

जिहादींचे समर्थन करणाऱ्या गिलानींना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार

datta jadhav
error: Content is protected !!