तरुण भारत

श्रीनगर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर आढळला IED बॉम्ब

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

श्रीनगर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीला (ROP) IED बॉम्ब सापडला. हा बॉम्ब सैन्याने वेळीच डिफ्यूज केल्यामुळे अनर्थ टळला. एक्सप्लोझिव्ह टप्पर पट्टनच्या पेट्रोल पंपाजवळील पुलाखाली हा बॉम्ब बसविण्यात आला होता. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. 

Advertisements

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला उद्या (दि.5 ऑगस्ट) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर फुटीरतावादी आणि पाकिस्तानी गट काळा दिवस साजरा करत हिंसक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. तसेच दहशतवादीही घातपात करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आज आणि उद्या (दि.5) श्रीनगरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 

दहशतवाद्यांकडून घातपाताची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये शोध मोहीम राबविली जात आहे.

Related Stories

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा ‘सेफ गेम’?

Patil_p

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात 1 जुलैपासून सुरू होणार ओपीडी सेवा

Rohan_P

कोरोना काळातही मोदी लोकप्रियतेत ‘टॉपर’

Patil_p

उत्तराखंडात 400 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Rohan_P

वायनाडमध्ये राहुल गांधी यांनी चालविला ट्रक्टर

Patil_p

काँग्रेस नेत्याची ब्राह्मणांना धमकी

Patil_p
error: Content is protected !!