तरुण भारत

सांगली : कोरोनाबाधितांवर सरसकट मोफत उपचार व्हावेत

प्रतिनिधी / सांगली

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर खाजगी रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने सांगलीत धरणे आंदोलन करण्यात आले. सांगलीतील स्टेशन चौकात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दीपक माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शासनाच्या या फसवी योजना जाहीर करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध असो अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या यावेळी माने म्हणाले की सरकार एकीकडे सर्व करुणा रुग्णांवर मोफत उपचार याची घोषणा करीत आहे तरी दुसरीकडे अनेक गोरगरीब रुग्णांना लाखोंची बिले खाजगी रुग्णालयात दिले जात आहेत.

Advertisements

कोरोनामुळे गेल्या काही महिन्यापासून सर्व स्तरातील लोकांचे अर्थकारण बिघडले आहे लोकांचे रोजगार गेले असून शिल्लक असलेल्या पैसाही खर्च होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना कोणत्याही वैद्यकीय बिल सोसणार नाही. गेल्या काही दिवसापासून सांगली शहरात खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कुणालाही दिला जात नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक हादरले आहेत. मृतदेह अडविण्याचे प्रकार घडत आहेत जिल्हा प्रशासनास हि आम्ही याबाबत निवेदन दिले होते रुग्णांवर मोफत उपचार याची कोणतीही नियोजन सध्या खासगी रुग्णालयांमध्ये दिसत नाही ज्यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखवायचे आहे त्यांना ती फुल असल्याने खाजगी रुग्णालयाचा रस्ता दाखवला जात आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी वाढल्या आहेत लवकरात लवकर जिल्हा प्रशासन व शासनाने यात मार्ग काढून रुग्णांवर मोफत उपचार करावेत अन्यथा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात अश्रफ वानकर, राहुल माने, संतोष रुपनर, टायगर ग्रुप अध्यक्ष पिंटु माने, अक्षय पाटील, अमित भोसले राजू जाधव, प्रथमेश वैद्य, युवती अध्यक्ष ज्योति कांबळे, चेतन माडगुळकर, प्रवीण कुलकर्णी, सागर खंडागळे, सोहम जोशी, श्रीराम चव्हाण, रूषी माने, राजू माने, शुभम माने, जगन्नाथ सांळुखे, प्रतीक पाटील, प्रथमेश कुलकर्णी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

वाहतूक सुविधेच्या माहितीसाठी जिल्ह्यात 13 नियंत्रण कक्ष कार्यान्वित

Abhijeet Shinde

क्रिडाई कोल्हापूरचा स्वदेशीचा नारा!

Abhijeet Shinde

इंजिनियर मारहाण प्रकरण: ‘CCTV फुटेज ताब्यात घ्या’, उच्च न्यायालयाचे आदेश

Abhijeet Shinde

मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, त्या नाराज नाहीत – देवेंद्र फडणवीस

Abhijeet Shinde

पेठ वडगाव : माजी नगराध्यक्ष विश्रांत माने यांचे निधन

Abhijeet Shinde

सचिन वाझे हृदयविकारावर खासगी रुग्णालयात घेणार उपचार, न्यायालयाने दिली परवानगी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!