तरुण भारत

सॅमसंग आणणार स्वस्त स्मार्टफोन्स

चीनविरोधातील संधीचा घेणार लाभ : कंपनी दुसऱया स्थानी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मागील काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात सीमासंघर्ष उफाळून आला होता. दोन्ही देशांच्या सैन्याचे प्रमुख शांतता प्रस्थापित करण्यासाठी अजूनही बैठका घेत आहेत. परंतु चीनचा दुटप्पीपणा आजही कायम पहावयास मिळत आहे. भारताने चीनविरोधात व्यापारात कोंडी करण्याचे सूत्र वापरण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

 याचाच एक भाग म्हणून चीनच्या जवळपास 59 ऍप आणि अन्य उत्पादनांवर प्रतिबंध लावला आहे तर दुसऱया बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवरील अन्य कंपन्या भारतात चीनला टक्कर देण्याच्या उद्देशाने स्वस्त व नवीन उत्पादने आणण्याचा प्रयत्न सॅमसंग कंपनी करणार असल्याचे संकेत आहेत. वर्षात दुसऱया तिमाहीत सॅमसंगने 26 टक्के बाजार समभागासोबत दुसरे स्थान पटकावले आहे. देशातील चीनविरोधी भावना तीव्र असतानाच त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न द. कोरियाची कंपनी सॅमसंग करत आहे. कंपनी भारतामधील आपले नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन्स तसेच अन्य उपकरणे बाजारात आणण्याची तयारी करते आहे. यामध्ये शाओमीसह अन्य चिनी कंपन्यांना टक्कर देणारी उत्पादने भारतीयांना देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे संकेत आहेत.

Related Stories

सॅमसंग गॅलक्सी टॅब बाजारात

Omkar B

मोटोरोलाचा इ 7 स्मार्टफोन सादर

Omkar B

रियलमीचे स्मार्टवॉच-नॉइसचे एअर बड्स बाजारात दाखल

Omkar B

शाओमी फोल्डेबलची गॅलेक्सीशी टक्कर

Patil_p

रियलमीचा ‘एक्स 7, एक्स 7 प्रो’ 5-जी स्मार्टफोन सादर

Patil_p

‘एअरपॉड मॅक्स’चे ऍपलकडून लाँचिंग

Omkar B
error: Content is protected !!