तरुण भारत

गुगलचा अफोर्डेबल फोन पिक्सल 4 ए सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गुगलने नवीन पिक्सल 4 ए स्मार्टफोनला कार्यालयीन स्वरुपात ग्लोबल पातळीवर सादर केले आहे. यामध्ये कंपनीने पिक्सल 3 ए मॉडेलमध्ये बदल  करुन त्याचे नव्याने सादरीकरण केले आहे. यामध्ये पंच होल डिझायन डिस्प्ले देण्यात आला असून याला साधारण मॉडेलही म्हटले आहे.

Advertisements

स्मार्टफोनला फ्रंट आणि मागील बाजूला एक कॅमेरा आहे. तर पिक्सल 4 ए मध्ये टायटन एम सिक्मयुरिटी मॉडेल, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर आदी सुविधा देण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

गुगल पिक्सल 4 ए चे 5 जी मॉडेलही सादर केले आहे. परंतु ते भारत आणि सिंगापूर या ठिकाणी उपलब्ध नाही तर पिक्सल 4 ए आणि पिक्सल 5 फोन्स अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, आयलँड, फ्रान्स, जर्मनी, जपान, तैवान आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले आहे.

गुगल पिक्सल 4 ए : ऑक्टोबरमध्ये बाजारात

कंपनीने गुगल पिक्सल 4 ए सिंगल 6 जीबी+ 128 जीबी मॉडेल बाजारात उतरवले आहे. याची अमेरिकेतील बाजारात किमत 26,300 रुपये राहणार आहे. तर भारतात हे मॉडेल ऑक्टोबरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार असून याला फ्लिपकार्टच्या मदतीनेही खरेदी करता येणार आहे. याची किमत भारतात किती ठेवण्यात येणार आहे, याची स्पष्टता कंपनीने केलेली नाही.

Related Stories

सॅमसंगचा फोल्डेबल फोन झाला स्वस्त

Patil_p

रेडमी 9 पॉवर आज होणार दाखल?

Omkar B

थर्मोमीटरसह लाव्हाचा नवा मोबाइल बाजारात

Patil_p

सोनी प्ले स्टेशन 5 चा कार्यक्रम लांबणीवर

Patil_p

सॅमसंगचा नवा एम-51 भारतात लाँच

Patil_p

ई-फसवणुकीपासून सावधान

tarunbharat
error: Content is protected !!