तरुण भारत

सातारा जिल्ह्यातून आज 69 जणांना डिस्चार्ज, कोरोनाचे 5 बळी

सातारा / प्रतिनिधी

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 69 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले, तर 432 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर वाई येथील एका महिलेचा व एका पुरुषाचा, महाबळेश्वर येथील तीन असे एकूण पाच जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये
कराड तालुक्यातील शारदा क्लिनिक कराड येथील 17 वर्षीय युवती 17 वर्षीय युवक 58,37 वर्षीय महिला 24,20 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 1 वर्षीय बालक, 26 वर्षीय महिला, कासारशिरंबे येथील 14 वर्षीय बालीका, कवठे येथील 26 वर्षीय पुरुष,कालवडे येथील 58,50 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 40 वर्षीय पुरुष,कार्वे येथील 6 वर्षीय बालक, शामगाव येथील 34 वर्षीय पुरुष, अटके येथील 90,59 वर्षीय पुरुष 82, 64, 26 वर्षीय महिला, मलकापूर येथील 53 वर्षीय महिला, सह्याद्री हॉस्पिटल येथील 51 वर्षीय पुरुष.
पाटण तालुक्यातील नेरले येथील 55 वर्षीय महिला, अंब्रग येथील 55, 34, 23 वर्षीय महिला, 13 वर्षीय बालीका 8 वर्षीय बालक 55 वर्षीय पुरुष, म्हावशी येथील 42,24, 54 वर्षीय पुरुष 58 वर्षीय महिला, निगडे येथील 35 वर्षीय महिला, अडुळ येथील 37 वर्षीय पुरुष,
वाई तालुक्यातील पसरणी येथील 45 वर्षीय पुरुष 18, 16 वर्षीय युवक 42, 49 वर्षीय महिला, रेनवले येथील 28 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील कण्हेर येथील 62 वर्षीय पुरुष 65 वर्षीय महिला, रामकुंड येथील 35 वर्षीय पुरुष, तामजाईनगर येथील 44 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 67 वर्षीय पुरुष 55 वर्षीय महिला, काशिळ येथील 23,37 वर्षीय पुरुष 36, 60 वर्षीय महिला 19 वर्षीय युवक, लक्ष्मी टेकडी सदर बझार येथील 1 पुरुष व 4 महिला 50 वर्षीय महिला, जिहे येथील 38,45 वर्षीय पुरुष,पोगरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 24 वर्षीय पुरुष, केसरकर पेठ येथील 37 वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील 33 वर्षीय पुरुष.
कोरेगांव तालुक्यातील शेळकेवाडी येथील 9 वर्षीय बालक, 26 वर्षीय पुरुष.
जावली तालुक्यातील रायगाव येथील 43 वर्षीय पुरुष 34 वर्षीय महिला.
फलटण रविवार पेठ येथील 27 वर्षीय महिला.

432 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 28, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 111, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 15, कोरेगांव 4, वाई येथील 34, खंडाळा येथील 77, पानमळेवाडी 23, मायणी 32, महाबळेश्वर 5 व कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 103 असे एकूण 432 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

5 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू
क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे सुरुर ता. वाई येथील 65 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा, सातारा येथील खाजगी रुग्णालयात महाबळेश्वर येथील 57 वर्षीय पुरुषाचा, नाकिंदा ता. महाबळेश्वर येथील 60 वर्षीय पुरुषचा तसेच वाई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये बावधन ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष व गोडवली पाचगणी ता. महाबळेश्वर येथील 80 वर्षीय पुरुष अशा 5 कोरोना बाधित रुग्णांचा उपाचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

घेतलेले एकूण नमुने 30362
एकूण बाधित 4560
घरी सोडण्यात आलेले 2287
मृत्यू 147
उपचारार्थ रुग्ण 2126

Advertisements

Related Stories

देशातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात

datta jadhav

सातारा : उंब्रजच्या कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी कोरोनाबाधित

datta jadhav

कुरुंदवाड ९ जुलैपर्यंत लॉकडाऊन

Abhijeet Shinde

१०८ वर्षांच्या आजींनी घेतले लसींचे दोन्ही डोस; जयंत पाटलांनी साडीचोळी देऊन केला सत्कार

Abhijeet Shinde

लांबपल्याची वाहने वगळता पुणे – बेंगळूर महामार्ग ठप्प

Abhijeet Shinde

वनवासमाची 11, मलकापूर 9

Patil_p
error: Content is protected !!