तरुण भारत

ऑस्ट्रेलिया-विंडीज टी-20 मालिका लांबणीवर

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

येत्या ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि विंडीज यांच्यातील होणारी तीन सामन्यांची टी-20 मालिका लंबणीवर टाकण्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी केली आहे.

Advertisements

या मालिकेतील सामने टाऊनसिव्हेली, केर्न्स आणि गोल्डकोस्ट येथे अनुक्रमे 4,6आणि 9 ऑक्टोबर राजी खेळविले जाणार होते. आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी ही सरावाची मालिका आयोजित केली होती पण आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केल्याने आता विंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका लांबणीवर टाकण्यात आल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले. ऑस्ट्रेलिया आणि झिंबाब्वे यांच्यातील वनडे मालिका यापूर्वीच लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये होणारा दक्षिण आफ्रिकेचा विंडीज दौरा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आला आहे. विंडीजचे बरेच क्रिकेटपटू या कालावधीत संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱया आयपीएल स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Related Stories

चेन्नई- कोलकाता आज चुरशीचा सामना

Patil_p

स्पेनचा अँडय़ूजेर उपांत्य फेरीत

Patil_p

शाहू कारखान्यातर्फे मॅटवरील कुस्ती स्पर्धांचे आयोजन

Abhijeet Shinde

कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत जडेजा पुन्हा अग्रस्थानी

Patil_p

लंकेचा पहिला डाव 204 धावात समाप्त, पेरुमलचे 5 बळी

Patil_p

दिल्लीतील प्रदुषित वातावरणात आज उपांत्यपूर्व सामने

Patil_p
error: Content is protected !!