तरुण भारत

राज्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 72 टक्के

मंगळवारी 238 कोरोनामुक्त तर 259 बाधित

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

कोरोनाचा विळखा वाढत चालला असून मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. मंगळवारी चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 1901 वर पोहोचली आहे. काल 238 रुग्ण कोरोनामुक्त झाले कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 60 वर पोहोचली आहे. लोकांमध्ये कोरोनाची धास्ती वाढत चालली आहे.

राजधानी पणजीसह अन्य भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाबाधित वयस्क रुग्णांचा मृत्यू होत असताना आल्तिनो पणजी येथील एका 29 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला मृत्यू आला. वास्को येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 389 झाली आहे. कुठ्ठाळी येथील रुग्णसंख्या 288 झाली आहे. मडगावाची रुग्णसंख्या 114 वर पोहोचली आहे, तर फोंडाची कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 144 झाली आहे. पणजीची रुग्णसंख्या 78 झाली आहे, तर म्हापसाची रुग्णसंख्या 67 झाली आहे, तर ाdनचिबंलची रुग्णसंख्या 98 झाली आहे, तर डिचोली 12, सांखळी 52, पेडणे 26 तर वाळपईची रुग्णसंख्या 58 झाली आहे.

हळदोणा 20, बेतकी 22, कांदोळी 45, कासारवर्णे 6 तर कोलवाळची रुग्णसंख्या 37 झाली आहे. खोर्ली 30, शिवोली 10, पर्वरी 38 व मये येथील रुग्णसंख्या 8 झाली आहे. कुडचडे येथील रुग्णसंख्या 26, काणकोण 8, तर बाळ्ळीची रुग्णसंख्या 50 झाली आहे, कासावली 32, चिंचीणी 1, कुडतरी 48, लोटली 24 व मडकईची रुग्णसंख्या 28 झाली आहे. केपे 30, सांगे 16, शिरोडा 33, धारबांदोडा 38 व नावेलीची रुग्णसंख्या 37 एवढी झाली आहे.

काल मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये दोन मडगावचे तर एक पणजी व एक वास्कोच्या रुग्णांचा सामावेश आहे. अजून 570 चाचण्यांचे अहवाल यायचे आहेत. लोकांमध्ये कोरोनामुळे प्रचंड भीतीचे वातावरण असून सरकारचे धोरण नेमके काय हेच कळणे सध्या कठीण बनले आहे.

  • राज्यात 4 ऑगस्टपर्यंत कोरोनाबाधित    7075
  • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण                    5114
  • उपचार घेणारे सक्रिय रुग्ण                     1901
  • 4 ऑगस्टला बरे झालेले रुग्ण                 238
  • 4 ऑगस्ट रोजी मृत्यू                4

Related Stories

गोव्याची राजकीय प्रयोगभुमी होऊ देऊ नका

Omkar B

पेडणेच्या प्रसिद्ध पुनवेवा भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

राजेश फळदेसाई यांची वाहनसेवा ठरली मोठा आधार

Patil_p

केपे पालिकेत एकूण 76 उमेदवारी अर्ज

Amit Kulkarni

‘शॅडो कौन्सिल’कडून 650 मास्क, 2 हजार हातमोज्यांचे वितरण

Omkar B

रवी नाईक यांची लोकप्रियता कायम

Patil_p
error: Content is protected !!