तरुण भारत

आठवणी तीन कारसेवेंच्या!

रामलल्ला हम आये है!!!

अयोध्येत 1988, 1990 आणि 1992 साली कारसेवा झाली. या कारसेवेचे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने स्वीकारुन चलो अयोध्या असा नारा दिला. ‘aरामलल्ला हम आये है… मंदिर वही बनाएंsगे…’ अशा जोशपूर्ण घोषणांनी  कारसेवकांच्या झुंडीच्या झुंडी अयोध्येच्या दिशेने कूच करु लागल्या. यात सहभागी झालेल्या कोल्हापूरच्या कारसेवकांनी   जागविलेल्या आठवणी…

Advertisements

कोल्हापूर / संग्राम काटकर

किर्लोस्करवाडीतच पोलिसांनी घेतले ताब्यात…राम मंदिराची उभारणी हे लक्ष्य ठेवून 1992 साली झालेल्या कारसेवेत दाखल होण्यासाठी कोल्हापुरातील 13, शिरोलीतील 15, कळे येथील 6, इचलकरंजीतील 8 जण अयोध्याकडे रेल्वेने चाललो होतो. मात्र पोलीसांनी किर्लोस्करवाडीत रेल्वे अडवून सर्वांना ताब्यात घेतले. रात्रभर तेथील एका शाळेत आम्हाला ठेवले. दुसऱया दिवशी सर्वांची नावे आणि हातांचे ठस्से घेऊन कोल्हापुरातील पोलिसांच्या स्वाधीन केले. पुढील काहीत तासात विवादीत ढाच्या पाडल्याची माहिती मिळताच सर्व हिंदुतत्वादी कार्यकर्त्यांनी शहरात साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे (बजरंग दलाचे तत्कालीन जिल्हा संयोजक)

……………………………………..कोल्हापुरातील कारसेवकांचा संपर्कच तुटला…

ढाच्यावर एक तरी प्रहार करायचाच असा निश्चय केला होता. ढाच्यात पाडतेवेळी बांधकामाचा काही भाग अचानक माझ्या अंगावर पडला. यात छाती व पायाला इजा झाली. जखमी झाल्याचे पाहून काही कारसेवकांनीच मला फैजाबादेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे कोल्हापुरातील कारसेवकांचा संपर्कच तुटला. दवाखान्यात सलाईन लावले होते.  कारसेवकांशी संपर्क कधी होणार याचीही धाकधुक होतीच. मात्र सुदैवाने एक-दोन दिवसांनी मला कोल्हापूरच्या कारसेवकांकडे सोडण्यात आले. 

प्रमोद सगरे (विश्व हिंदू परिषद)

………………………………………आनंदोत्सवात मुस्लिमांचाही होता सहभाग

1992 मध्ये अयोध्येतील विवादीत ढाच्याच्या जागी संपूर्ण देशभरातून 2 ते 3 लाखांहून अधिक कारसेवक आले होते. कोल्हापूर जिह्यातूनही 1200 कारसेवक रेल्वेने अयोध्येला गेले होते. ढाच्या जमिनदोस्त होईपर्यंत या सर्वांनी अयोध्येतच मुक्काम केला होता. ढाच्या पाडल्यानंतर अयोध्यावासियांनी अक्षरशः दिवाळीसारख्या फटाक्या वाजून आनंदोत्सव साजरा होता. वैशिष्ठय़ म्हणजे या आनंदोत्सवात तेथील मुस्लिम बांधवही सहभागी होते. शिवाय त्यांनी ढाच्या पाडतेवेळी कसलाही प्रतिकार केला नाही.

बाबा देसाई (भाजपचे जेष्ठनेते)

…………………………………………………………………….चार राज्यात राममंदिराबाबत जनजागृती केली…

1988 साली कोल्हापूर ते अयोध्या अशी दुचाकी फेरी काढली होती. फेरीत अडीचशे वाहनांवरुन पाचशे कार्यकर्ते सहभागी झाले होते. रामरथही होता. सलग 20 दिवसांचा प्रवास करत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान या 4 राज्यांतील गावांमध्ये सभा घेऊन राममंदिराबाबत जनजागृती केली. गावांमधील लोक आम्हाला फळे आणि जेवणही देते होते.

प्रकाश कुलकर्णी ः (बजरंग दलाचे तत्कालीन जिल्हामंत्री)

…………………………………………………………………….

अलाहाबादेतील लोकांनी लपण्यास जागा दिली…

1988 साली कोल्हापूरातून अलाहाबादेपर्यंत 20 जण गेलो होतो. तेथे ठिकठिकाणी राममंदिरासाठी सत्यागृह केला. यावेळी दगडफेकीलाही सामोरे जावे लागले. पोलीस हवेत गोळीबार करत होते. आम्हाला वाचविण्यासाठी अलाहबादेतील लोक आम्हाला लपण्यास घरात जागा देत होते. जेवणही देत होते. ज्या घरात आम्ही लपलो होतो, त्यात घरातून रात्रीच्या सुमारास बाहेर पडून आडमार्गाने अयोध्येकडे कूच करत होतो. 

प्रफुल्ल जोशी (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)

…………………………………………………………………….

आंदोनलाचे नेतृत्वकर्ते शंकराचार्य व माधवराव साळुंखे 

विश्व हिंदू परिषदने राम मंदिरासंदर्भात आंदोलन पुकारले होते. त्याकाळी या आंदोलनाचे लोण कोल्हापूरातही पसरले होते. या आंदोलनात कोल्हापूरचाही सहभाग असावा यासाठी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्याशंकर भारती व विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष (कै). माधवराव साळुंखे यांनी जिह्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जमवाजमव केली. नेतृत्वाची जबाबदारी स्वतः स्वीकारली. आंदोलन कुणाच्या धर्माविरोधात नाही तर व्यवस्थेविरोधात आहे, हे कार्यकर्त्यांना पटवून सांगितले. त्यामुळेच कोल्हापूरात धार्मिक वादंग निर्माण झाला नसल्याचे जाणकार सांगत आहेत.

Related Stories

पवार-मोदींमध्ये ‘सहकार’

Patil_p

सांगली जिल्ह्यात नवे 250 तर 524 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

दूधगंगा उजव्या कालव्यात पडला दहा गव्यांचा कळप

Abhijeet Shinde

‘या’ काँग्रेस नेत्याने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Abhijeet Shinde

कुडाळात गुटख्याविरोधात मोठी कारवाई

NIKHIL_N

एस्कॉर्ट्स लिमिटेडचा निव्वळ नफा 83 टक्क्यांनी वाढला

Patil_p
error: Content is protected !!