तरुण भारत

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 7 लाखांवर

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 7 लाखांच्या पार गेली आहे. जगभरात आतापर्यंत 1 कोटी 87 लाख 27 हजार 023 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 7 लाख 04 हजार 784 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर 1 कोटी 19 लाख 40 हजार 685 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 60 लाख 81 हजार 554 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 65 हजार 377 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 49 लाख 18 हजार 770 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 60 हजार 318 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. ब्राझीलमध्ये 28 लाख 08 हजार 076 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 96 हजार 096 जणांचा मृत्यू झाला आहे. 

ब्राझीलनंतर मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या जास्त आहे. मेक्सिकोत 4 लाख 49 हजार 961 रुग्ण आढळले असून, 48 हजार 868 जणांचा मृत्यू झाला आहे. इंग्लंडमध्ये 3 लाख 06 हजार 293 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 46 हजार 299 जण दगावले आहेत. 

Related Stories

हेरगिरीसाठी सोडलेले पाकिस्तानातील कबुतर ताब्यात

datta jadhav

‘मारबर्ग’ व्हायरसमुळे एकाचा मृत्यू; WHO कडून खबरदारीचा इशारा

datta jadhav

पाकिस्तान : मृत्यूदर वाढला

Patil_p

‘या’ ४३ जणांचा केंद्रीय मंत्रीमंडळात होणार समावेश

Abhijeet Shinde

पंतप्रधान मोदींशी पंजाब मुख्यमंत्र्यांची चर्चा

Patil_p

चीनमध्ये आढळली सर्वात जुनी टांकसाळ

Patil_p
error: Content is protected !!