तरुण भारत

सोलापूर : बार्शीत रामलल्ला भूमिपूजनचे जल्लोषात स्वागत

प्रतिनिधी / बार्शी


गेली अनेक वर्ष आयोध्या नगरी मध्ये प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थळाचा वाद गाजत होता. सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयानंतर प्रभू श्रीरामांचे मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर दिनांक पाच ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन चा कार्यक्रम आज आयोध्या नगरीत पार पडला असतानाच बार्शी शहर आणि तालुक्यात या भूमिपूजन सोहळ्याचा आनंद पहावयास मिळाला. बार्शीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभू श्री राम मंदिर भूमिपूजनचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा आनंदोत्सव साजरा करताना बार्शीतील श्री राम मंदिर येथे भगवान श्रीरामांची पूजा करण्यात आली. या पूजनानंतर बार्शी शहर व तालुक्यातील कारसेवकांचा सत्कार संघ कार्यालयात बा.न.प.चे पक्षनेते विजय नाना राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जवळपास 50 कारसेवकांचा फेटा बांधून, पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.

Advertisements


या सत्कार समारंभानंतर बार्शीतील संघ कार्यालयात प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन व आरती विजय नाना राऊत यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. यावेळी प्रभू श्रीरामांचा जयजयकार व जयघोष करण्यात आला.
याचबरोबर श्री राम मंदिर भूमिपूजनचा आनंदोत्सव सोहळ्याचा भाग म्हणून आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व मॉर्निंग क्लबच्या वतीने बानपा पक्षनेते विजय नाना राऊत यांच्या हस्ते छत्रपती भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर बार्शी शहर व परिसरात नविन 5000 झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला. याचबरोबर आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी आनंदोत्सव कार्यक्रमास, भाजपचे नगरसेवक प्रशांत कथले, भाजपचे जि.प.सदस्य तालुकाध्यक्ष मदन दराडे, शहराध्यक्ष महावीर कदम, कारसेवक संतोष सुर्यवंशी, पंचायत समिती सदस्य प्रमोद वाघमोडे, अविनाश मांजरे, उमेश बारंगुळे, नगरसेवक ॲड. महेश जगताप, विजय चव्हाण, भैया बारंगुळे, संदेश काकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक मोहन श्रीरामे,अनिल खजिनदार,तुषार महाजन, सूर्यकांत देशमुख,विश्व हिंदू परिषदेचे सतीश आरगडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव बापूसाहेब कदम, श्री शिंदे, मेजर मोरे, बबन चकोर, समाधान पाटील, प्रशांत खराडे, कारसेवक, अभाविपचे पदाधिकारी व रामभक्त उपस्थित होते.

Related Stories

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर

triratna

कोल्हापूर : कबनुरात कोरोनाबाधित संख्या २७ वर, आज आणखी दोघांचा बळी

triratna

रामकृष्ण सेवा मंडळ साताराच्यावतीने मदत

Patil_p

मोदी सरकारच्या दबावाखाली ट्विटरकडून कारवाई – नाना पटोले

triratna

शाळा दिवाळीनंतरच

triratna

पुणे : कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही : अजित पवार

Rohan_P
error: Content is protected !!