तरुण भारत

कोल्हापूर : काळाम्मावाडी धरण ७६.४१ टक्के भरले, दुधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर


प्रतिनिधी / सरवडे

राधानगरी तालुक्यात गेले दोन दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे धरण व नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. काळाम्मावाडी येथील राजर्षी शाहू जलाशय धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासात १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण साठवण क्षमतेचा २६ टीएमसीपैकी धरणात १९.४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे त्यामुळे धरण ७६.४१ टक्के भरले आहे. आतापर्यंत धरण परिसरात २०६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
काळाम्मावाडीतून वाहणाऱ्या दुधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून या नदीवरील सुळंबी, तुरंबे आणि कसबा वाळवे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या बंधार्यावरील वहातुक पूर्णपणे बंद झाली आहे.पावसाची अशीच संततधार सुरु राहिली तर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Related Stories

आमदारांचं निलंबन एकतर्फी, विरोधी पक्षाचा नंबर कमी करण्याचा हा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

triratna

मनसेला आणखी एक मोठा धक्का; आता ‘हा’ नेता भाजपमध्ये

Rohan_P

कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी 10 जुलैची अधिसूचना रद्द

triratna

जोतिबा मंदिर परिसरात आता प्रसाद वाटपास मनाई

tarunbharat

हातकणंगले परिसरात उनाड फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल

triratna

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोना मृत्यूमध्ये वाढ, 34 बळी, 1197 नवे रुग्ण

triratna
error: Content is protected !!