तरुण भारत

पाटगाव परिसरात अतिवृष्टी , तिरवडे येथे घरांची पडझड

पाटगांव / वार्ताहर


पाटगाव परिसरात वादळी वाऱ्यासह धरणक्षेत्रात अती वृष्टी झाली असून झालेल्या प्रचंड पावसामुळे भुदरगड तालुक्यातील वेदगंगा नदीवरील पाटगाव धरण आज सकाळपर्यंत ८० % भरले आहे, गतवर्षी या तारखेस धरण ९२ टक्के भरले होते, गेल्या 24 तासात सुमारे १०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे तसेच तालुक्यातील मेघोली कोंडोशी तीन लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत त्यामुळे वेदगंगा नदी च्या नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे पाटगाव प्रकल्पातून वीजनिर्मितीसाठी ३०० क्‍युसेक पाणी वेदगंगा नदी पात्रात सोडल्याने वेदगंगा नदीचे पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास वेदगंगा नदीला महापूर येण्याची शक्यता आहे तर तिरवडे येथील भीमराव मसू गुरव याचे रहाते घर कोसळले यामध्ये प्रापंचिक साहित्यासह अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाले आहे . सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोणत्याही क्षणी घर पूर्णपणे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.घटनेची पहाणी व पंचनामा तलाठी सुहास सलगर, ग्रामसेवक श्री.मोहिते सरपंच कुंडलिक सुतार,पोलिस पाटील बाबासो सुतार यांनी केला.

Related Stories

कबनूरच्या सुरेखा फराकटेला उंच उडीत रजत पदक

Abhijeet Shinde

प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्याचा मुहूर्त कधी ?

Abhijeet Shinde

कोल्हापूरचा १७ राज्यांतील रूग्णांना आधार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : आईचा खून करुन काळीज खाणाऱ्या विकृतास मरेपर्यंत फाशी

Abhijeet Shinde

यशवंत विचारांचा जिल्हा राहिल

Patil_p

पुन्हा लॉकडाऊन नको असल्यास काळजी घ्या – आयुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!