तरुण भारत

सलग पाचव्या महिन्यात सेवा क्षेत्रात घसरण

मागणी कमी, कर्मचारी कपातीचाही प्रभाव

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशाचे सेवा क्षेत्र जुलै महिन्यातही मंदीच्या छायेत राहिले आहे. बुधवारी सादर करण्यात आलेल्या मासिक सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या थैमानामुळे बाजारातील मागणी कमी झाली आणि कंपन्यांनी  अतिरिक्त उत्पादन कमी केले तर काहींनी ते बंद केले. सोबत कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱयांच्या संख्येत घट केल्याची माहिती आहे.

आयएचएस मार्केट इंडिया सर्व्हिसेस बिजनेस ऍक्टीव्हीटी निर्देशांकात जुलैमध्ये काहीशी सुधारणा होत निर्देशांक 34.2 वर पोहोचला आहे. तर हाच आकडा जूनमध्ये 33.7 वर होता. सुधारणा होत गेल्यानंतर निर्देशांक 50 पेक्षाही खाली गेला आहे. इतक्मया घसरणीमुळे जुलैमधील सेवा क्षेत्र मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाल्याची माहिती समोर आली आहे. निर्देशांक 50 पेक्षा अधिकने जेव्हा खाली जातो, तेव्हा तो जास्तच घसरतो, सुधारणेनंतर सेवा क्षेत्र जुलैमध्ये सलग पाचव्या महिन्यात घसरले आहे.

आयएचएस मार्केट इंडिया सर्व्हिसेस मॅनेजर्स निर्देशांकानुसार हा निर्देशांक 50 च्या खाली गेल्यास संबंधीत क्षेत्रातील उत्पादनात घट झाल्याची नोंद करण्यात येते.

Related Stories

स्टेट बँक म्युच्युअल फंडाची नवी गुंतवणूक योजना

Patil_p

ट्विटरकडून लिमिट रिप्लाय फिचर

Patil_p

चढउताराच्या प्रवासात सेन्सेक्सची घसरण

Patil_p

पॅनासोनिक लाईफ सोल्यूशन्स स्टोअर्सचा प्रारंभ लवकरच

tarunbharat

कल्पतरू पॉवरला मिळाले कंत्राट

Amit Kulkarni

वाहन-आरोग्य विम्यांचे हप्ते मुदत वाढविली

Patil_p
error: Content is protected !!