तरुण भारत

मारुती, हय़ुंडाई उत्पादनात वाढ करणार

दोन्ही कंपन्यांचा बाजारातील विक्रीतला वाटा 68 टक्के 

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्या मारुती सुझुकी आणि हय़ुंडाई मोटर इंडिया यांनी कार्सच्या उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मारुती सुझुकीने येत्या ऑक्टोबरमध्ये 1 लाख 60 हजार ते 1 लाख 70 हजार इतक्मया गाडय़ांचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनी कर्मचाऱयांना ज्यादा काम करण्याचा पर्याय ठेवणार आहे. याप्रमाणेच हय़ुंडाई मोटर इंडियानेही आपल्या गाडय़ांचे उत्पादन 58 हजार ते 60 हजारपर्यंत वाढवण्याचे निश्चित केले आहे. या दोन्हीही ऑटोमोबाईल क्षेत्रात स्पर्धेतल्या आघाडीवरच्या कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे दोघांनी येत्या काळात ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन उत्पादनात वाढ करण्याचे ठरवले आहे. दसरा, दिवाळी आणि त्यानंतरच्या काळात वाढणारी मागणी लक्षात घेऊन कंपनी उत्पादन वाढीवर भर देणार आहे. पेटा आणि वेन्यु या गाडय़ांची मागणी अधिक असल्याने यावरही लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. या दोन्ही कंपन्यांचा बाजारातील एकत्रित कार विक्रीचा वाटा हा 68 टक्के इतका आहे.

Related Stories

ओमेगा सेइकीची व्यावसायिक वाहने दाखल

Patil_p

महिंद्राने थार डिझेल वाहने परत मागवली

Patil_p

‘अल्काझार’ने एमजी हेक्टरला टाकले मागे

Amit Kulkarni

सुझुकीची मोटरसायकल विक्री तेजीत

Amit Kulkarni

सुझुकीचा 10 लाख उत्पादनाचा टप्पा पार

Patil_p

फोर्ड, एमजी मोटर्सची विक्री घटली

Patil_p
error: Content is protected !!