तरुण भारत

मुतगा येथे श्रीराम प्रतिमेचे पूजन

प्रतिनिधी/ बेळगाव

अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमिवर मुतगा येथे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. बेळगाव तालुक्मयातील अनेक गावांत श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Advertisements

भाजप बेळगाव ग्रामीणचे अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या हस्ते मुतगा येथे श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाआरती, दीपोत्सवाने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी उमेश पुरी, गजानन बिरादार, कृष्णा पाटील आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येत उपस्थित होते. 

उचगावमध्ये फटाक्यांची आतषबाजी

उचगाव येथे श्रीराम भक्तांनी आयोध्या येथे सुरू असलेल्या राम मंदिर भूमीपूजनाच्या मुहूर्तावर गावामध्ये प्रभात फेरीसह फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी माजी ग्रा. पं. सदस्य अरुण जाधव व शंकर गिरी यांच्या हस्ते श्रीराम फोटोपूजन करण्यात आले. यावेळी नागेंद्र तरळे, बाबू चौगुले, रघू लाळगे, बाळू मण्णूरकर, परशराम कोवाडकर, विष्णू नवार, शरद जाधव, हणमंत चौगुले, सुरेश देसाई, बसवंत कोवाडकर, दत्ता कोवाडकर, विलास सुर्वे यासह उचगाव, बसुर्ते या गावातील नागरिक उपस्थित होते.

Related Stories

शांताई वृद्धाश्रमात रंगला ‘जायंट्स’ चा भजनसंध्या कार्यक्रम

Patil_p

कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाजातर्फे रविवारी कीर्तन

Patil_p

या महिन्यातील रेशनचे वाटप 5 जून पासून

Patil_p

यल्लापूरमध्ये अपघातात दोन महिला ठार

Amit Kulkarni

शांताई आणि क्रीश फौंडेशन तर्फे डॉ.भूषण सुतार यांचा सत्कार

Rohan_P

वन टच फौंडेशनच्यावतीने गरजूंना साहित्य वितरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!