तरुण भारत

टीव्ही सेंटरमधील बेळगाव-वनमध्ये चोरी

एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

टीव्ही सेंटर परिसरातील बेळगाव-वन कार्यालयात चोरीची घटना घडली आहे. कुलूप फोडून चोरटय़ांनी कार्यालयात प्रवेश केला असून चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र चोरटय़ांनी एक लॉकर पळविल्याचे उघडकीस आले आहे.

नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कर्मचारी कार्यालय उघडण्यासाठी आले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. यासंबंधी कार्यालयाचे व्यवस्थापक नंजुडेश्वर चलवादी यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी पुढील तपास करीत आहेत.

सीसीटीव्हीचे स्वीच ऑफ करून चोरटय़ांनी कार्यालयात प्रवेश केला आहे. या कार्यालयातील एकूण तीन कुलूप फोडण्यात आले आहेत. रोकड शोधण्यासाठी सर्व ड्राव्हर तपासण्यात आले आहेत. चोरटय़ांच्या हाती 700 रुपये रक्कम लागली आहे. महत्त्वाची कागदपत्रे व आधारकार्ड असलेले एक लॉकर चोरटय़ांनी पळविले आहे.

चोरीची दुसरी घटना

या कार्यालयातील चोरीची ही दुसरी घटना आहे. 8 ऑक्टोबर 2016 रोजी बेळगाव-वन कार्यालयाचे कुलूप फोडून चोरटय़ांनी साडेतीन लाख रुपये पळविले होते. चार वर्षांनंतर याच कार्यालयात पुन्हा चोरीची घटना घडली आहे. एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

जमखंडीत दोन महिलांना कोरोनाची बाधा

Patil_p

क्लोजडाऊनमुळे बेळगाव पासपोर्ट कार्यालय बंद

Amit Kulkarni

प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून पतीची हत्या

Patil_p

रस्त्याच्या विकासापूर्वी ड्रेनेजवाहिनीची दुरुस्ती करा

Amit Kulkarni

परप्रांतीय कामगारांची पायपीट सुरू

Amit Kulkarni

निदर्शनास आलेला बिबटय़ा की केवळ अफवा?

Patil_p
error: Content is protected !!