तरुण भारत

कर्नाटक: ५६१९ पॉझिटिव्ह तर २४ तासांत ५४०७ रुग्ण बरे, १०० रूग्णांचा मृत्यू

बेंगळूर/ प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये बुधवारी कोरोना संसर्गाची ५६१९ नवीन प्रकरणे नोंदली गेली. यासह, संक्रमित लोकांची एकूण संख्या १. ५ लाखावर गेली आहे. तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आणखी १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी ५ हजाराहून अधिक रुग्णांना कोरोनमुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यात एकूण १,५१,४४९नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७३,९५८ रूग्णांवर उपचार सुरू असून ७४,६७९ रुग्ण बरे झाले आहेत तर कोरोनामुळे २,८०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी एकूण १५,९०४ आरटी-पीसीआर आणि २७,७३४ जलद प्रतिजैविक चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत एकूण १५,३२,६५४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

बेंगळूरमध्ये रुग्णवाढ सुरूच
राजधानी बेंगळूरमध्ये राज्यापाठोपाठ शहरातही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. बुधवारी नवीन ५,६१९ रूग्णांपैकी ११,४८ रुग्ण बेंगळूर शहरात सापडले आहेत. राजधानीत संक्रमित लोकांची एकूण संख्या ६४,८८१ वर पोहोचली आहे. यापैकी, ३२,७५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३०,९६० रूग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी बुधवारी ३,०८३ रुग्णांना रुग्णालयातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे १,१६३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी २९ मृत्यूची नोंद केवळ बुधवारी झाली आहे.

Advertisements

Related Stories

आरपीडी येथील चिपिंग अपघातांना ठरतेय कारणीभूत

Amit Kulkarni

लॉकडाऊन काळात दारू विकणाऱया युवकाला अटक

Amit Kulkarni

नंजनगुड येथे वज्रदेह राज्यस्तरीय शरीरसौष्टव स्पर्धा 19 रोजी

Amit Kulkarni

ऍग्री गोल्ड एजंट-गुंतवणूकदारांचे 20 रोजी आंदोलन

Amit Kulkarni

विजापूरकडे धावणाऱया बसेस उगार, ऐनापूर मार्गे सोडाव्यात

Patil_p

गोवावेस येथील एका बाजूचा रस्ता वर्षभरापासून बंदच

Omkar B
error: Content is protected !!