तरुण भारत

कोरोनाच्या कहरातही अवघा गोवाही राममय

प्रतिनिधी / पणजी

अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाचा उत्साह गोव्यातही विविध मंदिरातून दिसून आला. अनेक मंदिरात रामजप, आरती, भजन, पूजन असे विविध कार्यक्रम भक्तांनी करत राममंदिराचे स्वागत केले. राजधानी पणजीसह राज्यातील विविध शहरात, गावात असलेल्या मंदिरांमध्ये पणत्यांची रोषणाई करण्यात आली. गोव्यातील राममंदिरांतून हे कार्यक्रम मोठय़ा उत्साहात झाले. घरोघरी श्रीराम गुढय़ा उभारण्यात आल्या व सायंकाळी पणत्या लावण्यात आल्या.

Advertisements

पणजीतील महालक्ष्मी व साईबाबा (बोक द व्हाक) मंदिरात दिव्यांची आरास करण्यात आली होती. रामाची भजने लावण्यात आल्याने अनेक मंदिरात राममय वातावरण झाल्याचे दिसून आले. अनेकांनी आपापल्या घरावर भगवा ध्वज फडकवून  तसेच सायंकाळी पणत्या पेटवून राममंदिर भूमीपूजनाचे स्वागत केले. अनेक मंदिरात पूजा, अभिषेक, रामस्तोत्राचे पठण करण्यात आले. गोव्यात ठिकठिकाणी बॅनर्स लावून व फटाके लावून राममंदिर भूमीपूजनानिमित्त आनंद व्यक्त करण्यात आला. गीत रामायणाची धून अनेक ठिकाणी लावण्यात आली होती. अनेक ठिकाणी श्रीरामाची प्रतिमा लावून पूजन करण्यात आले.

Related Stories

पेडणेतील घन कचरा प्रकल्पाचे काय झाले?

Amit Kulkarni

राजेश फळदेसाई यांचा वाढदिवस उत्साहात

Amit Kulkarni

मित्रानेच केला मित्राचा खून

Patil_p

सोमवारी 125 जण कोरोनामुक्त

Patil_p

गोल्डन बूटधारक इगोर अँग्युलो देणार ओडिशासाठी एफसी गोवाला सोडचिठ्ठी

Amit Kulkarni

बांदोडा पंचायतीतर्फे शिवजयंती साजरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!