तरुण भारत

जम्मू काश्मीरमध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

ऑनलाईन टीम / कुलगाम : 

जम्मू काश्मीरमधील  कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी भाजप सरपंचाची गोळ्या घालून हत्या केली आहे. काझीगुंड येथील राहत्या घरी सजाद अहमद यांची हत्या करण्यात आली. सजाद आपल्या घराबाहेर असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. 

Advertisements


वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सजाद यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. इतर सरपंचांसोबत सज्जाज सुरक्षित असलेल्या निर्वासित कॅम्पमध्ये राहत होते. आज सकाळी कॅम्प सोडून ते आपल्या घरी गेले होते. 20 मीटर अंतरावरुन दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांचं निधन झाले आहे. 


याआधी जून महिन्यात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित सरपंच अजित पंडित यांची देखील हत्या केली होती. तर मागील 48 तासातील ही दुसरी घटना आहे. बुधवारी 4 ऑगस्ट रोजी कुलगाम जिल्ह्यातील मीर बाजारच्या अखरण भागात सरपंच पीर अरिफ अहमद शाह यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Related Stories

झारखंडमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 51.33 टक्के

Rohan_P

जोधपूरमध्ये एकाच कुटुंबातील 11 पाकिस्तानी शरणागतींचा मृत्यू

datta jadhav

कोरोनामुळे जीव गमाविणाऱया पत्रकारांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत

Patil_p

4 ऐवजी 2 महिन्यांचा असणार हरिद्वार महाकुंभ

Patil_p

दुखापतीमुळे आर्चर दोन महत्त्वाच्या स्पर्धेतून बाहेर

Patil_p

कृषी क्षेत्रात आधुनिकीकरणाची आवश्यकता

Patil_p
error: Content is protected !!