तरुण भारत

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भाविकाविनाच पार पडला दक्षिणद्वार सोहळा

प्रतिनिधी / कुरुंदवाड

गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने येथे बुधवारी रात्री साडेअकरा ते पावणे बाराच्या दरम्यान या मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. मात्र सध्या कोरोना महामारी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शन बंद असल्याने हा दक्षिणद्वार सोहळा भाविका विनाच पार पडला.
मंगळवार पासून शिरोळ तालुक्यात पडणाऱ्या दमदार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत 24 तासात तब्बल पंधरा फूट वाढ झाली बुधवारी रात्री आठच्या दरम्यान पुराचे पाणी नुर्सिंहवाडी येथील दत्त मंदिरात शिरले यामुळे मंदिरातील सर्व साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

पाणी पातळी वाढतच होती अखेर रात्री साडे अकरानंतर दत्त मंदिराच्या उत्तर द्वारातून पुराचे पाणी गाभाऱ्यात आले व श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडले दक्षिण द्वारातून बाहेर पडलेल्या तीर्थ स्नान करणे पवित्र मानले जाते मात्र सध्याच्या कोरोना महामारी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने कोणतेही भाविकाला पवित्र स्नानाचा लाभ घेता आला नाही.

लॉकडाऊनमुळे मंदिर पाच महिने झाले बंद आहे. त्यातच कृष्ण पंचगंगा नदीचे पाण्याची पातळी वाढल्याने बुधवारी रात्री दक्षिणद्वार सोहळा झाला. पण 17 मार्च पासून मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने हा रात्री उशीरा झालेला दक्षिणद्वार सोहळा भाविकावीणा पार पडला
गेल्या पाच महिन्यापासून शासन आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी बंद आहे. असे असले तरी एक सामाजिक बांधिलकी म्हणून गावातील लोकांना सुमारे सहा लाख रुपये खर्चाचे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले, तसेच मास्क व सॅनिटायझर ही देण्यात आले, दत्त देव संस्थानचे यात्री निवास कोविंड रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले. आता शासनाला एक विनंती आहे. सर्व नियमांचे काटेकोर पालन करून दर्शनासाठी परवानगी द्यावी त्याच बरोबर श्री दत्त महाराजांच्या चरणी ही कोरोनाचे संकट नष्ट व्हावे अशी प्रार्थना केली आहे.

Related Stories

उद्योजकांनी भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा

Patil_p

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात डेंग्यू, चिकनगुनियाचा फैलाव

Abhijeet Shinde

तीन हजारांची लाच घेताना वडूजचा सर्कल ताब्यात

Patil_p

खेड येथून दोन लाख रुपयांचे दागिने लंपास

Patil_p

प्राथमिक आरोग्य केंद्रात कुरघोड्यांचे`राजकारण’

Abhijeet Shinde

कोल्हापूर : उचगावात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!