तरुण भारत

आष्टवक्रासन

अष्टवक्रासन हे अत्यंत अवघड  आसन आहे. तथापि, या आसनाचे फायदेही अनेक आहेत.

ङहे आसन नियमित केल्याने मनगटे, हात, खांदे मजबूत होतात. पचनसंस्था आणि तेथील अवयवांचे कार्य सुधारते. शरीर आणि हात मजबूत होतात. श्वसन, पचनसंस्थांचे कार्य सुधारते. बद्धकोष्ठता आणि पचनाचे विकार दूर होतात. अस्थिरता कमी होते. याखेरीज एकाग्रता वाढते.

Advertisements

कसे करावे आसन?

  • सर्वप्रथम सरळ ताठ उभं राहा. दोन पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवा. श्वास सोडत पुढे वाका. दोन्ही हातांचे तळवे पायांच्या पावलाच्या बाजूला टेकवावेत. नंतर गुडघ्यांमध्ये थोडसं वाका. उजवा हात उजव्या पायाच्या आतील बाजूनं घेऊन उजव्याच पायाच्या पावलाच्या पाठीमागे ठेवा.
  • नंतर हाताचा पंजा उजव्या पायाच्या पाठीमागून पावलाच्या बाहेरील बाजूस घट्ट रोवा. उजव्या गुडघ्याच्या पाठीमागे उजव्या हातावर गुडघ्याची पाठीमागील बाजू तोला जोपर्यंत गुडघा वर येऊन उजव्या हाताच्या खांद्यावर तोलला जात नाही.
  • उजव्या गुडघ्याखालील भाग खांद्यावर दाबला जाईल आणि पाय सरळ करा. नंतर डावा पाय उचलून उजव्या बाजूकडे उजव्या हाताच्या खालच्या बाजूनं घेऊन सरळ करा.
  • उजवा आणि डावा दोन्ही पायांच्या घोडय़ांची एकमेकांमध्ये गुंफण करून बंदिस्त करा. शरीर थोडंसं डाव्या बाजूकडे कलतं करा. शरीराचा भार डाव्या हातावर टाका आणि तोला. जमिनीपासून काही इंचापर्यंत पाय वरती उचला. पूर्णपणे उजव्या हाताचा आणि पायाचा आधार घ्या.
  • श्वास सोडत कोपरांमध्ये हात वाकवा. शरीराचा कंबरेवरील भाग पुढे झुकवून खाली आणत जमिनीला समांतर करा. पाय मात्र जमिनीला लंब हवेत. उजव्या हाताचा वरचा भाग हा दोन्ही पायांच्या मांडय़ांमध्ये दाबला गेला पाहिजे.
  • याच दाबाचा उपयोग करून शरीराच्या धडाचा भाग डाव्या बाजूकडे ट्विस्ट करा. कोपर धडाच्या जवळ पाहिजे.
  • या आसनस्थितीत जमिनीकडे एका बिंदूवर नजर स्थिर करा.
  • ही आसनस्थिती अर्धा ते एक मिनिटापर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करा.

कोणी करु नये?

मनगट, कोपर किंवा खांद्याची दुखापत असल्यास, श्वसनाचा किंवा हृदयाचा त्रास असल्यास हे आसन करू नये.

Related Stories

कोरोना आजारातील महत्वाचे दिवस

Amit Kulkarni

प्लाज्मा थेरपीचे वरदान

Omkar B

स्टार्चयुक्त पदार्थ खातंय

Amit Kulkarni

लस आवश्यकच: पण …..

Omkar B

लहान मुले आणि कोरोना

Omkar B

कोरोना काळात उपयुक्त गॅजेट

Omkar B
error: Content is protected !!