तरुण भारत

मारुतीची एस क्रॉस बाजारात दाखलमारुतीची एस क्रॉस बाजारात दाखल

मुंबई : मारुती सुझुकी इंडियाची पेट्रोल इंधनावर आधारित नवी एस क्रॉस ही कार नुकतीच बाजारात दाखल झाली आहे. उत्तम डिझाईन, आरामदायी अनुभव यासह विविध आधुनिक सुविधा या गाडीत देण्यात आल्या आहेत. ऑटोमॅटिक प्रकारात पेट्रोल इंधनावरची ही गाडी बीएस-6 श्रेणीची असून स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीच्या  माध्यमातून बनलेल्या या कारला रेन सेंसिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्पस व रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स तसेच कॅमेऱयाची सुविधा देण्यात आली आहे. 8.39 लाख ते 12 लाख 39 हजार रुपये इतकी गाडीची किंमत असणार आहे.

‘एचपी’चा चेन्नईत निर्मिती कारखाना

Advertisements

चेन्नई : टेक क्षेत्रातली कंपनी एचपीने चेन्नईत आपला नवा कारखाना सुरू केला आहे. या कारखान्यात कंपनी डेस्कटॉप व वर्कस्टेशन्सची निर्मिती करणार आहे. सध्याची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने श्रीपेरंबदूर येथे निर्मिती कार्याला सुरुवात केली आहे. बंदर जवळ असल्याने कंपनीने चेन्नईत कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून याचा व्यवसायासाठी उपयोग होणार आहे. तसेच स्पेअर पार्टचा कारखाना बेंगळूरमध्ये असल्याने तेथून निर्मितीसाठी लागणारे आवश्यक सुटे भाग घेणे चेन्नई जवळ असल्याने कंपनीला सोयीचे ठरणार आहे.आहे.

केटीएम 250 डय़ुक बाजारात दाखल

नवी दिल्ली : केटीएम कंपनीने भारतीय बाजारात आपली नवी 250 डय़ुक ही मोटारसायकल दिमाखात दाखल केली आहे. बीएस-6 श्रेणीवर आधारित ही गाडी एलईडी हेडलॅम्पसह येणार आहे. अँटी ब्रेकिंग सिस्टिमसह येणारी ही गाडी डार्क गालवानो व सिल्वर मेटालिक या रंगात उपलब्ध असेल. या गाडीची किंमत 2 लाख 9 हजार 280 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी असणार आहे.

Related Stories

चहा उद्योगातील कर्मचाऱयांसाठी लवकरच कल्याणकारी योजना?

Amit Kulkarni

सरकार एनएफएलमधील वाटा विकणार

Patil_p

ब्रिटन देणार ‘हुवाई’ला टक्कर

Patil_p

वीज मागणीत 3.15 टक्क्मयांनी घट

Patil_p

दोन कंपन्यांचा दबदबा योग्य नाही – ट्राय

Patil_p

‘पेटीएम’चा 22 हजार कोटींचा आयपीओ लवकरच

Amit Kulkarni
error: Content is protected !!