तरुण भारत

आरबीआयच्या बैठकीनंतर बाजारात तेजी

वृत्तसंस्था /मुंबई :

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहिर करण्यात आले आहे. यामध्ये गुरुवारी पतधोरणासंदर्भात बैठक पार पडली. यामध्ये व्याजदर स्थिर ठेवण्याची घोषणा आरबीआयकडून करण्यात आल्याने बाजारात गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात समभाग खरेदीचा सपाटा लावल्याने दोन्ही बाजार घसरणीपासून  लांबच राहिल्याचे पाहायला मिळाले.

दिवसभरातील कामगिरीत सेन्सेक्स 362 अंकांनी वधारला तर काही काळ सेन्सेक्सने 558 अंकांची उंची प्राप्त केल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 362.12 अंकांनी वधारुन निर्देशांक 38,025.45 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 98.50 अंकांनी वधारुन निर्देशांक 11,200.15 वर स्थिरावल्याचे दिसून आले आहे.

सेन्सेक्समध्ये प्रमुख टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक म्हणजे चार टक्क्मयांनी वधारले आहेत. सोबत इन्फोसिस, बजाज फायनान्स, टीसीएस, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक आणि टेक महिंद्रा यांचे समभाग नफ्यात राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये प्रामुख्याने भारती एअरटेल, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, ऍक्सिस बँक यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण निश्चित करण्यासाठीची बैठक संपन्न झाली. पतधोरण समितीने रेपोदरात कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नसून रेपो रेट 4 टक्के कायम ठेवला आहे. याप्रकारे रिव्हर्स रेपोदर हा 3.35 टक्के कायम राहणार आहे. केंद्रीय बँका पुढील काळात विविध पर्यायी मार्गांचा विचार करणार आहे. या सर्व घडामोडींचा प्रभाव मात्र भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक झाल्याचे दिसून आल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण राहिल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

 अंतरबँक विदेशी चलन विनिमय बाजारात रुपया 74.94 प्रति डॉलरवर स्थिरावला आहे. अन्य आशियाई बाजारात चीनचा शांघाय कम्पोझिट आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी नफ्यात राहिलेत. तसेच हाँगकाँगचा हँगसेंट व जपानचा निक्की हे घसरणीत राहिले आहेत. ब्रेंट कच्च्या तेलाचे वायदा मूल्य 0.04 टक्क्मयांनी नुकसानीसोबत 45.19 डॉलर प्रति बॅरेलवर आले आहे.

Related Stories

आगामी काळात तेजीचे संकेत

Patil_p

किरकोळ व्यावसायिक सरकारच्या पाठिशी

Patil_p

मार्चमध्ये टायटनची विक्री तेजीत

Patil_p

कार्लाइलचा पिरामलमध्ये 20 टक्के हिस्सा

Patil_p

दूरसंचार उपकरणे निर्मितीला मिळणार बळ

Patil_p

अदानीला मिळाले 45 हजार कोटींचे मोठे कंत्राट

Patil_p
error: Content is protected !!