तरुण भारत

सांगली : पाच जणांचा मृत्यू, 168 रूग्ण वाढले

प्रतिनिधी / सांगली

गुरूवारी जिल्हय़ात नवे 168 रूग्ण वाढले तर 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असणाऱया पाच जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. त्यामुळे जिल्हय़ात आतापर्यंत 118 जणांचा बळी गेला आहे. एकूण रूग्णसंख्या 3916 झाली आहे. तर उपचारातील रूग्णसंख्या 2121 झाली आहे.

Advertisements

महापालिका क्षेत्रात 117 रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्रात गुरूवारी 117 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 68 आणि मिरज शहरात 49 रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरातील गावभाग, खणभाग, शंभरफुटी, हनुमानगर, जुना बुधगाव रोड, भोसले प्लॉट, विश्रामबाग पोलीस लाईन, लक्ष्मीमंदिर, स्फूर्ती चौक या भागात रूग्ण वाढले आहेत. तसेच शहरातील विविध कंटेन्मेंट झोनमध्ये ऍण्टीजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील या कंटेन्मेंट झोनमधील काही व्यक्ती या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्या आहेत. आता सांगली शहरातील रूग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण महापालिकेकडून मोठयाप्रमाणात सुरू असणाऱया ऍण्टीजन टेस्टमध्ये अवघे दहा ते 15 टक्केच रूग्ण आढळून येत आहेत. तसेच जे रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या जवळचे अनेक नातेवाईकही आता निगेटिव्ह येत असल्याचे समोर आले आहे. मिरज मध्ये किल्ला भाग, यशवंतनगर, दर्गा कमान वेस, हडको कॉलनी, शनिवार पेठ, टाकळी रोड, मगदूम एरिया, शालिनीनगर याठिकाणी रूग्ण वाढले आहेत. मिरजेत 49 रूग्ण वाढले आहेत. तर सांगलीत 68 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात एकूण रूग्णसंख्या दोन हजार 366 इतकी झाली आहे.

ग्रामीण भागात 51 रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातही आता कोरोना आटोक्यात येवू लागला आहे. जत तालुक्यात दोन, कवठेमहांकाळ तालुक्यात तीन, खानापूर तालुक्यात दोन, मिरज तालुक्यात 35, पलूस तालुक्यात एक असे रूग्ण वाढले आहेत. शिराळा तालुक्यात दोन, तासगाव तालुक्यात तीन वाळवा तालुक्यात तीन असे एकूण 51 नवीन रूग्ण या ग्रामीण भागात वाढले आहेत. त्यांच्यावर आता त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी उपचार सुरू करण्यात आले आहेत.

पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

जिल्हय़ात गुरूवारी उपचार सुरू असताना पाच जणांचा उपचारारदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये वाळवा तालुक्यात कोरेगाव येथे 52 वर्षाच्या व्यक्तीचा वानलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला आहे. सांगली शहरातील नळभागातील 64 वर्षीय व्यक्तीचा वानलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला आहे. तर कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथील 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तासगाव तालुक्यातील नागाव येथील 82 वर्षीय व्यक्तीचा सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला तर वाळवा शहरातील 66 वर्षीय महिलेचा कुल्लोळी हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या पाच रूग्णांच्या मृत्यूमुळे जिल्हय़ात कोरोनाने आजपर्यंत 118 बळी गेले आहेत.

जिल्हा परिषदेमधील अधिकारी, कर्मचाऱयांचे स्वॅब निगेटिव्ह

जिल्हा परिषदेमध्ये मोठयाप्रमाणात कोरोनाचा शिरकाव केला आहे. त्यामुळे बाधित कर्मचाऱयांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱयांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार यांच्यासह अन्य कर्मचाऱयांचे स्वॅब घेण्यात आले होते. हे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱयांनी आता सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान भिलवडी पोलीस ठाण्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. याठिकाणी एका पोलीस कोरोनाने बाधित आढळून आला आहे.

98 जण कोरोनामुक्त

जिल्हय़ात जरी कोरोनाचे रूग्ण मोठय़ासंख्येने वाढत असले तरीसुध्दा कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. गुरूवारी 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण त्यांना आणखीन 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच जिल्हय़ात उपचार सुरू असणारे 100 जणांची प्रकृती मात्र अद्यापही चिंताजनक आहे.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती

एकूण रूग्ण 3916
बरे झालेले 1677
उपचारात 2121
मयत 118

Related Stories

सांगली : मिरज रेल्वे जंक्शन परिसरात नशेखोरांचा हैदोस

triratna

रयतच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

Patil_p

जावलीत कोरोनाचा विळखा सुटता सुटेना ..!

Patil_p

भिलवडी परिसरामध्ये वादळी पावसामुळे मोठे नुकसान

triratna

महाराष्ट्र : दिवसभरात 3 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

सोलापुरात एक लाख नागरिकांची रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करणार – पालकमंत्री

triratna
error: Content is protected !!