तरुण भारत

जेएमएफसी आवारातील झाडाची फांदी कोसळली

प्रतिनिधी / बेळगाव :

गुरुवारी जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातील झाडाची फांदी तुटून पडली. नेहमी या ठिकाणी वकील उभे असतात. वाहनेही पार्किंग केली जातात. मात्र कोरोना संकटामुळे न्यायालयाच्या आवारात पार्किंगवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वाहने आवाराच्या बाहेरच पार्किंग करण्यात आली होती. त्यामुळे मोठे नुकसान टळले आहे.

जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात विविध प्रकारची झाडे आहेत. ही झाडे मजबूत नाहीत. केवळ सावली आणि दिसायला डौलदार आहेत. मात्र मजबूतपणा नसल्यामुळे बऱयाचवेळा ही झाडे उन्मळून पडत आहेत. काही झाडांच्या फांद्या तुटून पडत आहेत. अशा घटनांमध्ये अनेकवेळा चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. मात्र, सावलीसाठी ही झाडे अजूनही तशीच ठेवण्यात आली आहेत. तेव्हा खराब झालेली झाडे काढून टाकून नवीन झाडांचे वृक्षारोपण करावे, अशी मागणी होत आहे. 

Related Stories

हलगा सांडपाणी प्रकल्पाचा हट्ट सोडा

Omkar B

माळी गल्लीत कासार महिलेला कोरोना

Rohan_P

एसपीएम रोडवर वाहतुकीची कोंडी

Patil_p

चमुकल्याने तयार केली तोरणागडाची प्रतिकृती

Patil_p

सुरक्षा उपकरणांसाठी व्यापाऱयांना नोटीस

Patil_p

सदाशिवनगर येथील बसथांब्याची दुरवस्था

Omkar B
error: Content is protected !!