तरुण भारत

कृषी खात्याने राज्याला ‘आत्मनिर्भर’ बनवावे : मुख्यमंत्री

प्रतिनिधी / मडगाव :

कृषी क्षेत्रात राज्यातील प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याची गरज आहे. आम्हाला अत्यावश्यक वस्तूसाठी इतर राज्याकडे अवलंबून न राहता राज्याला ‘आत्मनिर्भर’ बनविण्याचे काम केले पाहिजे. इतर राज्यातून येणाऱया प्रत्येक वस्तूचे पीक आपल्या राज्यातील नागरिकांनी घ्यावे, यासाठी आपण प्रयत्न करावे. सरकारचे शेतकऱयाना संपूर्ण सहकार्य असेल. युवकांनी सरकारी व खासगी नोकरीवर अवलंबून न राहता कृषी क्षेत्रात उद्योग करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. 

Advertisements

मडगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, कृषी खात्याचे संचालक नेविल आफान्सो, कृषी अधिकारी चंद्रहास देसाई, सत्यवान देसाई व इतर उपस्थित होते.

राज्यात एकूण 192 पंचायती असून जर कृषी खात्यातील प्रत्येक अधिकाऱयाने या पंचायतीतील किमान दहा ते वीस शेतकरी तयार केले तर कृषी क्षेत्रात बदल घडू शकतो. तसेच शेती व्यवसायातून शेतकऱयांना प्रत्येक वर्षी तीन लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न मिळाले तर युवकही सरकारी व खासगी नोकरीवर अवलंबून न राहता शेतीकडे वळतील. दुग्ध व्यव्यवसाय व मासे विकणाऱयाला सुद्धा आता कृषी किसान क्रेडिट कार्ड दिले जाते. यापूर्वी असे कधीही झाले नव्हते. कृषी कार्डच्यामाध्यमातून दिडलाख पर्यंतचे विनामूल्यकर्ज शेतकऱयांना दिले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे इतर राज्यात शेतकऱयांना कर्जामूळे आत्महत्या करण्याची पाळी येते. अशा प्रकारची समस्या राज्यातील शेतकऱयावर होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मडगाव येथे सुरु करण्यात आलेले कृषी विज्ञान केंद्राचा फायदा दक्षिण गोव्यातील शेतकऱयांना होईल. काजू इतर देशातून येत असून हे आता बंद होण्याची गरज आहे. शेतकऱयांनी काजूचे उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. असे ही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्याला कृषी प्रधान्य राज्य बनविण्याकरिता मुख्यमंत्री पुढाकार घेत आहे. त्यामूळे आज जास्तीत जास्त लोक कृषी क्षेत्रात वळत आहे. कृषीमंत्री या नात्याने त्यांनी मला संपूर्ण सहकार्य केलेले आहे. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा कृषी खात्याची कार्यालये बंद ठेवण्यात आली नाही. शेतकऱयांना कधीही त्रास होऊ नये याकरिता अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले. शेतकऱयांना आम्ही इतर नेत्यासारखे नुसते आश्वासन न देता काम करुन दाखवलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी सदैव शेतकऱयांच्या समस्या सोडविण्याकरिता प्रधान्य दिलेले आहे असे कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर यावेळी बोलताना म्हणाले.

मडगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. शेती संदर्भात या केंद्रात प्रशिक्षण घेऊ येणाऱया प्रत्येक शेतकऱयांची राहण्याची सोय केलेली आहे. शेतकऱयांनी शेतीकडे उद्योग म्हणून बघण्याची गरज आहे. सदर कृषी केंद्र एक कोटी 70 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेले आहे. शेतकऱयाचा मुलगा या नात्याने शेतीसंदर्भात संपूर्ण ज्ञान आहे. इतर नेत्यासारखे शेतीचा अभ्यास करण्याची मला गरज नाही. संजीवनी साखर कारखाना सुरु करावा की, नाही हे शेतकऱयांनी ठरावावे. सरकारचे संपूर्ण सहकार्य शेतकऱयांना असेल. त्यामूळे शेतकऱयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे असे श्री. कवळेकर म्हणाले.

Related Stories

स्थानिक गोमंतकीयांना न्याय देण्यास सरकार अपयशी

tarunbharat

भाजप सरकारने भूमिपुत्र विधेयक अद्याप रद्द केले नाही : खा. सार्दिन

Amit Kulkarni

भाजपला पराभव, गोव्याचे रक्षण हेच ध्येय

Amit Kulkarni

खाण पट्ट्या शेतकर्‍यांन समोर अनेक प्रश्न

GAURESH SATTARKAR

विरोधक आपल्या राजिनाम्याच्या अफवा पसरत आहे

Patil_p

पिळये आरोग्य केंद्रामुळे रुग्णांना दिलासा

Omkar B
error: Content is protected !!