तरुण भारत

हिमाचल प्रदेश : ऊर्जामंत्री सुखराम चौधरी यांना कोरोनाची लागण

ऑनलाईन टीम / शिमला : 


हिमाचल प्रदेशचे ऊर्जामंत्री सुखराम चौधरी आणि त्यांच्या दोन मुलींना कोरोनाची बाधा झाली आहे. ऊर्जामंत्री सुखराम चौधरी यांना रिपन रुग्णालयात तर त्यांच्या दोन्हीं मुलींना मशोबरा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मत्र्यांच्या मुलीचे आणि पत्नीचे नमुने आज घेतले जाणार आहेत. दरम्यान, सध्या संबंधित मंत्र्यांच्या कुटुंबीयांना आणि सचिवालयातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

Advertisements


ऊर्जा मंत्री सुखराम चौधरी यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले , मागील काही दिवसांपासून जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वतः ला आयसोलेट करावे तसेच स्वतः ची कोरोना टेस्ट करुन घ्यावी. 


जवळपास पाच दिवसांपूर्वी सुखराम चौधरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप हे एकत्रपणे पांवटा येथे गेले होते. तसेच पांवटा साहिब मधील त्यांच्या खाजगी सहाय्यक आणि त्यांच्या मित्राला ट्रूनेट मशीनद्वारे केलेल्या नमुना तपासणीत टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची खात्री नाहक मेडिकल कॉलेजच्या कोविड लॅब मधील तपासणी नंतर होणार आहे. 


डीसी आर. के. परूथी यांनी सांगितले की, ऊर्जा मंत्री ज्या ज्या भागात गेले होते तेथे सॅनिटाईझेशन केले जाणार आहे. 

Related Stories

उरलेल्या कापडातून शेकडो रोजगार…

Patil_p

ऑगस्ट महिन्यातच तिसऱ्या लाटेची धडक

Patil_p

कर्नाटकात प्रवेश करणार्‍या प्रवाशांच्या चाचणीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

Rohan_P

प्रशांत किशोरांनी सोडली ‘कॅप्टन’ची साथ

Amit Kulkarni

‘लस नाही तर दारू नाही’ ; ‘या’ जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा अजब नियम

Abhijeet Shinde

उध्दव ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरेंशी राहुल गांधींनी केली चर्चा; मुंबईतील कोरोना रोखण्यासाठी दिला ‘हा’ सल्ला

Rohan_P
error: Content is protected !!