तरुण भारत

नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / मुंबई : 


नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांना सौम्य ताप येत होता. त्यानतंर त्यांनी स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले होते. मात्र आता त्यांना वांद्रे येथील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, विजय केंकरे यांची आई ललिता केंकरे यांचे नुकतेच निधन झाले होते. तेव्हा पासून ते घरीच आहेत. त्यातच मागील सहा- सात दिवसापासून त्यांना ताप येत होता. त्यामुळे त्यांनी घरीच स्वत:ला क्वारंटाइन केले होते. मात्र, काल त्यांची तब्येत आणखी बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Related Stories

ऑनलाईन लग्नाची आगळीवेगळी गोष्ट शुभमंगल ऑनलाईन

Patil_p

करण जोहरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र; बॉलीवूडबाबत म्हणाला…

pradnya p

निवेदिता सराफ आहेत सुगरण

Patil_p

गोल्डन ग्लोबमध्ये ‘द क्राउन’चा वरचष्मा

Patil_p

डिसेंबरमध्येच होणार रणबीर-आलियाचं लग्न?

Omkar B

अजय देवगनच्या मावळय़ाने सांगितला नैराश्यावर मात करण्याचा मार्ग

Patil_p
error: Content is protected !!